एकनाथ शिंदेनी घेतली आमटे कुटुंबीयांची भेट - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०१ सप्टेंबर २०२०

एकनाथ शिंदेनी घेतली आमटे कुटुंबीयांची भेट

जागतिक दर्जाच्या रॅमन मॅगसेसे पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेल्या ज्येष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे व त्यांच्या पत्नी डॉ.सौ.मंदाकिनी आमटे यांनी उभारलेल्या हेमलकसा येथील लोक बिरादारी प्रकल्पास भेट दिली.
या भेटी दरम्यान त्यांनी उभारलेल्या आमटेज ऍनिमल आर्क, कृषी संशोधन, वन्यजीव मदत केंद्र, शाळा व महाविद्यालय, ३ऑपरेशन थिएटरसह सुसज्ज रुग्णालय, संगणक प्रशिक्षण व कौशल्य विकास केंद्रास भेट देत आदिवासी बांधवांच्या जीवनमान उंचावण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची पाहणी केली.

आयुष्यभर आदिवासी बांधवांसाठी सेवाभावी भावनेतून कार्यरत आमटे कुटुंबीय आणि त्यांचे सहकारी करत असलेल्या अद्वितीय कार्याबद्दल आभार व्यक्त करून राज्य सरकारच्या माध्यमातून हेमलकसात लोकबिरादरीकरिता आवश्यक ती मदत करण्यात येईल ग्वाही दिली.