दोलंदा जंगल परिसरातील पोलीस- नक्षल चकमकीची दंडाधिकारीय चौकशी होणार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०८ सप्टेंबर २०२०

दोलंदा जंगल परिसरातील पोलीस- नक्षल चकमकीची दंडाधिकारीय चौकशी होणार

गडचिरोली, ता. ८ : जारावंडी पोलीस मदत केंद्राअंतर्गत दोलंदा जंगल परिसरात २६ ऑगस्टला पोलीस -नक्षल्यांत चकमक झाली. त्या चकमकीदरम्यान एका महिला नक्षलवाद्याचा मृतदेह सापडला होता. या  घटनेतील मृत पावलेल्या महिलेच्या मृत्युच्या कारणांचा शोध लावणे आवश्यक असल्याने, या प्रकरणात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १७६ अन्वये दंडाधिकारीय चौकशी होणार आहे.
अनोळखी मृतकाचे दंडाधिकारीय तपास व चौकशी प्रक्रिया,  उपविभागीय दंडाधिकारी, एटापल्ली हयांचे न्यायालयात सुरु आहे. या घटनेच्या संबधात ज्यांना निवेदन करावयाचे आहे.  प्रतिज्ञापत्र सादर करावयाचे आहे त्यांनी हे मजकुर प्रसिध्द झाल्याचे दिनांकापासून १५ दिवसांचे आंत किंवा तत्पूर्वी कार्यालयीन वेळेत सादर करावीत. घटनेचे आपण पाहिल्या प्रमाणे वर्णन, आपला या घटनेविषयीचा अनुभव, घटनेनंतर किंवा आधी या घटनेशी काही घटना घडली असल्यास त्याविषयी माहिती सरकारी किंवा अन्ययंत्रणेच्या प्रतिक्रिया किंवा सहभाग यांच्या विषयी आपले म्हणणे, या घटनेशी संबंधीत इतर कोणतीही माहिती द्यावयाची असल्यास संपर्क करावा, असे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, मनूज जिंदल यांनी कळविले आहे.