दिनेश भेले यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींना त्वरित अटक करा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०५ सप्टेंबर २०२०

दिनेश भेले यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींना त्वरित अटक करा
▪️गौतम नगर वासीयांची निवेदनातद्वारे मागणी


शिरीष उगे(भद्रावती)
शहरातील गौतम नगर येथे राहणाऱ्या इसमाला वारंवार त्रास देऊन त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला त्यात तो गंभीर जखमी झाला या घटनेची तक्रार पोलिसात देऊन सुद्धा आरोपीवर कोणतीही कारवाई झाली नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी ठाणेदारांना निवेदन देण्यात आले.
यातील दिनेश नथुजी भेले राहणार गौतम नगर असे गंभीर जखमी असलेल्या इसमाचे नाव असून हा गेल्या कित्येक दिवसापासून या परिसरात वास्तव्यात आहे त्याच परिसरात सुखदेव फुलझेले यांचे सुद्धा मकान आहे. सुखदेव यांच्या मुलांनी दिनेश यांच्या परिवाराला यापूर्वीसुद्धा महाराण करणे त्रास देणे या प्रकारामुळे त्यांची पत्नी व मुलगा हे नाशिक जिल्ह्यात मोलमजुरी करून वास्तव्यात आहे दिनेश हा एकटाच घरी असल्याने त्याचा गैरफायदा घेऊन विकास सुखदेव फुलझेले, महेंद्र सुखदेव फुलझेले, व प्रशांत सुखदेव फुलझेले या तिघांनी लाठी व लोखंडी राड ने दिनेश ला मारहाण केली यात तो गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची तक्रार सात दिवसापूर्वी भद्रावती पोलिसात देऊन सुद्धा आरोपीवर कारवाई करण्यात आली नसल्याने दोषींवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी गौतम नगर येथील गोपी रामटेके, प्रवीण कांबळे, गणेश पाझारे, राज मेश्राम, शैलेश पोरकर, उज्वल सुखदेव, राम चांदेकर या सह गौतम नगर येथील नागरिकांच्या सह्याचे निवेदन ठाणेदारांना देण्यात आले.
==========================
*सुनील सिंग पवार ठाणेदार भद्रावती*
या घटनेबाबत चे निवेदन प्राप्त झाले असून दिनेश याला मारहाण प्रकरणाच्या तक्रारीवरून सुरुवातीला 324 गुन्हा दाखल करण्यात आला होता आता वैद्यकीय अहवालानंतर या आरोपींच्या गुन्ह्यात वाढ करण्यात आली असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल