इस्त्री करताना विजेच्या स्पर्शाने झटका लागून मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२४ सप्टेंबर २०२०

इस्त्री करताना विजेच्या स्पर्शाने झटका लागून मृत्यू
सावली तालुक्यातील व्याहाङ खुर्द येथील पत्रु खांडकूरे (व्याहाड, वय 26) या तरुणाचा कपङे इस्त्री करीत असताना विजेच्या स्पर्शाने झटका लागून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी घङली. सदर तरुण व्यवसायाने कपङे शिवणकाम करायचा. गावातील चाळीत दुकान होते. एका ग्राहकाच्या कपड्यांना इस्तरी करित असताना ही घटना घडली. झटका लागल्यानंतर बेशुद्ध पडल्यानंतर शेजारच्या नागरिकांनी गङचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. पण, जीव वाचू शकला नाही.