सिएसटीपीएस येथील कंत्राटी कर्मचा-यांना मिळणार 20 टक्के वेतनवाढीचा एरिएस - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२५ सप्टेंबर २०२०

सिएसटीपीएस येथील कंत्राटी कर्मचा-यांना मिळणार 20 टक्के वेतनवाढीचा एरिएस

सिएसटीपीएसच्या अधिका-यांशी बैठक
 कामगारांच्या न्यायक मागण्या निकाली काढण्याच्या सुचना

चंद्रपूर(खबरबात):
जानेवारी महिण्यापासुन येथील कंत्राटी कामगारांना 20 टक्के वेतनवाढ लागू झाली आहे. असे असले तरी मागील चार महिण्यांपासुनचा वेतनवाढीचा एरिएस थकीत असणे अन्यायकारक आहे. त्यामूळे या सर्व कामगारांना थकीत असलेला 20 टक्के वेतनवाढीचा एरिएस तात्काळ अदा करण्यात यावा असे निर्देश आज सिएसटिपीएस येथील बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिका-यांना दिले. त्यानंतर दोन ते चार दिवसात हा एरिएस कामगारांच्या खात्यावर जमा करण्याचे कंपणी व्यवस्थापणाने मान्य केले आहे. त्यामूळे कामगारांची थकीत वेतनवाढ एरिएस मिळण्याची प्रतिक्षा अखेर संपली आहे.

सिएसटीपीएस येथील कामगारांच्या विविध मागण्यांना घेऊन आमदार किशोर जोरगेवार यांनी सिएसटीपीएसच्या अधिका-यांसोबत बैठक घेतली. हिराई विश्रामगृह येथे पार पडलेल्या या बैठकीत सिएसटीपीएसचे मुख्य अभियंता सपाटे, उपमूख्य अभियंता ओसवाल, कल्याण अधिकारी आनंद वाघमारे, अधिक्षक अभियंता सुहास जाधव, डीएम शिवणकर यांच्यासह सिएसटिपीएसच्या कामगार नेत्यांची उपस्थिती होती.

चंद्रपूर महाऔष्णीक विद्यूत केंद्र आशिया खंडातील मोठे विद्यूत केंद्र आहे. येथील कामगारांच्या समस्यांही तेवढयाच मोठया आहेत. मात्र आता या कामगारांच्या समस्या सोडविण्याच्या दिशेने आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रयत्न सुरु केले आहे. दरम्यान आज शुक्रवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी पून्हा एकदा सिएसटिपीएसच्या अधिका-याशी बैठक घेत कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली. भविष्य निर्वाह निधी संदर्भात कामगारांमध्ये मोठा संभ्रम आहे. तो दुर करण्यासाठी या संदर्भात तक्रार निवारण केंद्र सुरु करुन या केद्रांत अधिका-याची नियुक्ती करण्यात यावी अशा सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या. येथे काम करत असलेल्या कामगारांच्या नौकरीची सुरक्षा सिएसटीपीएस प्रशासनाने घेत कोणत्याही कामगारावर कंत्राटदाराकडून अन्याय केल्या जाणार नाही याकडे लक्ष द्यावे असेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिका-यांना सांगीतले, कामगारांना वेतन पावती दिल्या जात नाही. हे न्यायक नाही त्यामूळे सर्व कामगारांना वेतन पावती देण्यात यावी, त्रिवेणी इंजिनीयरींग असोसिएट येथील कामगारांना कौशल्यानूसार वेतन द्यावे, येथील सुपरवाईजरला नियमानूसार आठ तासच काम देण्यात यावे, कामगारांची वारंवार साईट बदलविने बंद करावे, कोरोनामूळे प्रतिबंधीत क्षेत्र केलेल्या भागातील कामगार कार्त्यव्यावर न आल्यास त्याची वेतन कपात करु नये, सुरवाईजरला कौशल्यानूसार वेतन देण्यात यावे, गुड विल सेल्स एजन्सीतील कामगारांना 5 ऑक्टोबर पर्यंत थकीत भत्ते द्यावे, पूर्व सुचना न देता कोणालाही कामावरुन काढू नये, अडोरे कंपणीतील कार्यरत सुपरवाईजरला कोणतीही सुचना न देता कामावरुन कमी करण्यात आले आहे. या सुरवाईजरला पूर्ववत कामावर घेण्यासाठी कंत्राटरासह बैठक घेत तोडगा काढावा, सुरक्षा साधने उपलब्ध करुन, सुरक्षेचे नियम पाळावे आदि सुचना या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी सिएसटीपीएसच्या अधिका-यांना दिल्यात. या बैठकीत यंग चांदा ब्रिगेडच्या विज कामगार सेनेचे अध्यक्ष हेरमन जोसेफ, कार्याध्यक्ष प्रकाश पडाल, नितीन कार्लेकर, छोटेलाल रांगडहाले, विक्रम जोगी, रोहित ब्रम्हपूरीकर, आंनद इंगडे, तूलेंद्र तांडेकर, सुरेंद्र तूल आदिंची उपस्थिती होती.