Covid 19 च्या रुग्णांइतकीच सामान्य रुग्णांचीही काळजी घ्यावी : NCP ची मागणी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२५ सप्टेंबर २०२०

Covid 19 च्या रुग्णांइतकीच सामान्य रुग्णांचीही काळजी घ्यावी : NCP ची मागणीकोवीड-१९ च्या रुग्णांकडे जेवढे जातीने लक्ष देणे गरजेचे आहे तेवढेच लक्ष सामान्य रुग्णांकडेही द्यावे अशी मागणी प्रदेश चिटणीस दिलीप पनकुले यांनी केली. या अत्यंत महत्त्वपूर्ण मागणीचे निवेदन आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांचेकडे रवीभवन येथे देऊन या मूलभूत मागणीच्या संदर्भात त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रात दारिद्रय रेषेखाली असलेल्या सामान्य रुग्णांकडे व डिलीव्हरी वार्डकडेही जातीने लक्ष देण्याची गरज आहे.
मेडिकल, मेयो तसेच खासगी रुग्णालयांवर अंकूश लावणे आवश्यक असून त्यांना महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक सहकार्य व औषधी पुरवठा करण्यात यावा अशी विनंती दिलीप पनकुले यांनी केली.


कोवीड-१९ च्या महामारीत मृत्युमुखी पडलेल्या इसमांचे व महिलांचे सोने व मंगळसूत्र गायब होत असून ते नातेवाईकांना मिळत नाहीत. त्यांच्यावर परस्परच अत्यसंस्कार केले जात आहेत. तसेच मृतदेहांची अदलाबदल होण्याच्या घटनाही घडत असल्याचे ना. राजेश टोपे ह्यांच्या निदर्शनास आणून दिले. ह्या बाबत आपण गंभीर असून या अमानुष प्रकारांची चौकशी करण्यात येईल असा विश्वास ना. राजेश टोपे यांनी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाला दिला. या प्रसंगी सोपानराव शिरसाट व विक्रांत तांबे हे प्रामुख्याने उपस्थित होते.