नगरसेविकेच्या पतीचा कोविडने मृत्यू; दोन नगरसेवक बाधित - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२७ सप्टेंबर २०२०

नगरसेविकेच्या पतीचा कोविडने मृत्यू; दोन नगरसेवक बाधित
चंद्रपूर महानगरपालिकेतील एका महिला नगरसेविकेच्या पतीचा कोविडने मृत्यू झाल्याची बातमी रविवारी रात्री एकच्या सुमारास नगरसेवक पप्पू देशमूख यांनी फेसबूकच्या माध्यमातून दिली.
चंद्रपूरात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
पुन्हा एका महिला नगरसेविकेचे पती रूग्णालयात दाखल झाला आहे. दोन पुरूष नगरसेवक कोरोना बाधित,एक रूग्णालयात व एक होम आयसोलेशन मध्ये आहे. ही बाब चिंताजनक असून, येत्या काही दिवसांत भयावह स्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शनिवारी सायंकाळी आलेली माहिती

सात बधितांचा मृत्यू, नवीन 439 रुग्ण
चंद्रपूर : दादमहल वॉर्ड चंद्रपूर (८४, पुरुष), गणपती वॉर्ड भद्रावती (७०, पुरुष)), तुकूम चंद्रपूर (५८, पुरुष), जगन्नाथ बाबा नगर चंद्रपूर (५४, महिला), बीएड कॉलेज परिसर चंद्रपूर (५९, पुरुष), इंदिरानगर चंद्रपूर (५४, पुरुष), गडचिरोली (६४, पुरुष) यांचा कोरोनासह अन्य आजाराने मृत्यू झाला. जिल्ह्यात २४ तासात 439 कोरोनाबाधित आढळले.

कोरोना पॉझिटिव्ह : 9350
बरे झालेले : 5362
ऍक्टिव्ह रुग्ण : 3846
मृत्यू : 142 (चंद्रपूर 134)