गडचिरोली जिल्ह्यात ३० कोरोनाबाधित, तर ३६ कोरोनामुक्त - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ सप्टेंबर २०२०

गडचिरोली जिल्ह्यात ३० कोरोनाबाधित, तर ३६ कोरोनामुक्त

गडचिरोली, ता. ६ : जिल्ह्यात आज ३० जण कोरोनाबाधित आढळून आले, तर ३६ रुग्ण कोरोनाच्या आजारातून बरे झाले. आजच्या ३० नव्या पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये गडचिरोली येथील ११, आरमोरी तालुक्यातील ६, चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील ५, देसाईगंज ३, अहेरी ३ आणि कोरची येथील दोन रुग्णांचा समावेश  आहे.
गडचिरोलीतील ११ जणां‘ध्ये चंद्रपूर, नागभिड, सावगली व ब्रम्हपुरी येथून आलेले चार, एक सी-६० पथकातील पोलिस, एक सीआरपीएङ्क जवान, एक जिल्हा पोलिस आणि चार जण कोरोना रुग्णांच्या संपर्कातील तीव्र जोखमीचे आहेत. आरमोरी तालुक्यातील आढळलेले सहा रुग्ण, आष्टी येथील पाच आणि देसाईगंज येथील तीन रुग्ण कोरोना बाधिताच्या संपर्कातील आहेत. अहेरी येथील तीन रुगण हे विलगीकरणातील आहेत. कोरचीतील दोन रुगण हे डोंगरगड येथून आलेले आहेत.
आजच गडचिरोली येथील १२,  चामोर्शी येथील २३ आणि देसाईगंज येथील एक असे एकूण ३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत जिल्हयात १२८२ कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून, ९८९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या २९२ सक्रीय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.