कोरोनातून बाहेर पङताच आमदारांनी घेतली बैठक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१८ सप्टेंबर २०२०

कोरोनातून बाहेर पङताच आमदारांनी घेतली बैठक
जुन्नर /वार्ताहर
कोरोना संसर्गातून बाहेर पडल्यावर जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी कोरोना संदर्भात एक विशेष बैठक घेतली.
तहसीलदार हनुमंत कोळेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे, नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय गुंड आदी अधिकाऱ्यांसमवेत जुन्नर तालुक्यातील कोविड १९ च्या परिस्थिती संदर्भात बैठक पार पडली तसेच उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.

या बैठकीत खालील बाबींवर चर्चा करण्यात आली.


जुन्नर तालुक्यात कोविड १९ संदर्भात लेण्याद्री व ओझर येथील सेंटर अंतर्गत ७०० बेड्स कार्यरत आहेत. यामध्ये आणखी २५० बेड्स वाढविण्यात येणार आहेत.

तालुक्यात सध्या महाराष्ट्र शासन, खासगी रुग्णालये व ग्रामीण रुग्णालय व इतर संस्था यांच्या वतीने जवळपास १३१ ऑक्सिजन बेड्स कार्यान्वित केले आहेत. यासंदर्भात आणखी १०० ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

तसेच चालू असलेल्या कोविड सेंटर्स मधील व्यवस्थापन, जेवण, आरोग्य व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छता व इतर विषयांसंदर्भात ज्या काही त्रुटी असतील त्या दूर करून यात सातत्यपूर्ण काम कसे होईल याकडे विशेष लक्ष देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

ज्या पेशंट्सना प्लाझ्मा ची आवश्यकता आहे त्यासाठी एक हेल्पलाईन उपलब्ध केली जाईल. अनेक समाजसेवी संस्था यासाठी खूप चांगलं काम करत आहेत लायन्स क्लब हि संस्थाही प्लाझ्मादानासाठी चांगला कार्यक्रम राबविणार आहे त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.

ज्या व्यक्ती कोविड १९ मधून बऱ्या झाल्या आहेत. त्यांना आमदार अतुल बेनके यांनी प्लाझ्मादान करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. इतर रुग्णांना बरे होण्यासाठी मदत करावी.

तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या महाराष्ट्र शासनाच्या अभियानात सहभागी व्हा प्रशासनाला सहकार्य करा.

सर्वांनी स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, कुणीही आजार लपवून ठेवू नका. स्वच्छता राखा व मास्कचा वापर करा.