कोरोना रुग्णाचा मृतदेह चक्क घरीचं आणला - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३० सप्टेंबर २०२०

कोरोना रुग्णाचा मृतदेह चक्क घरीचं आणला
▪️शहरातील भोज वार्डात भीतीचे वातावरण

▪️अधिकाऱ्यांच्या सूचनांना दुर्लक्ष

शिरीष उगे (प्रतिनिधी भद्रावती/वरोरा) : भद्रावती शहरातील भोज वार्डात कोरोनाचा रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्याने येथील उपचारानंतर डॉक्टरांनी चंद्रपूर येथे रेफर केल्यानंतर त्याचा वाटेतच मृत्यू झाला. मात्र, अंत्यविधी करण्यासाठी भोज वार्ड येथे घरी मृतदेह आणल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.
बाहेरगावाहून आलेल्या पाहुण्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह निघाला होता. त्यांना जैन मंदिर येथील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी ठेवले होते त्यानंतर त्यांना होम क्वारन टाईन ठेवण्याकरिता आणले असता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किनाके यांनी चंद्रपूर कोव्हीड सेंटर येथे हलविण्याचा सल्ला दिला. परंतु वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याने या सर्व प्रकाराची माहिती लपवून त्याचा मृतदेह राहत्या घरी भोज वार्ड येथे आणला व संपूर्ण रात्र मृतदेह ठेवल्यानंतर पहाटे शेकडोंनी त्याच्या घरी भेटी दिल्या त्यानंतर रीतसर त्याचा विधी करून अंत्यविधीसाठी पाठविण्यात आले. हा संपूर्ण प्रकार चालू असतानासुद्धा या रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले नाही, अशी चर्चा आहे. 
  हा रुग्ण कोव्हीड सेंटरमध्ये  उपचार घेत होता. आज पहाटे डॉ. किनाके यांचा फोन आला होता. या रुग्णाला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले होते. परंतु त्याच्या नातेवाईकांनी मृत्यू झाल्यानंतर परस्पर घरी आणले.
- महेश शितोळे, तहसीलदार भद्रावती