'ए कमला, रडवू नकोस माझ्या बळीराजाला' - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१८ सप्टेंबर २०२०

'ए कमला, रडवू नकोस माझ्या बळीराजाला'
मोदी सरकारला नाही तर कांद्याला बळीराजाची कीव येतेय ;व्यंगचित्राच्या कुंचल्यातून राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी केंद्राला फटकारले...


मुंबई दि. १८ सप्टेंबर - केंद्रातील मोदी सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यामुळे बळीराजा रडकुंडीला आला आहे मात्र या बळीराजाची कीव अखेर कांद्याला आलीय आणि तोच कमलाबाईला 'माझ्या बळीराजाला रडवू नकोस' असे सांगत आहे अशा आशयाचे व्यंगचित्र काढून केंद्रसरकारच्या चुकीच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी आपल्या कुंचल्यातून फटकारले आहे.


'ए कमला,
रडवू नकोस माझ्या
बळीराजाला' असे व्यंगचित्र काढून आपल्या कुंचल्यातून प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकार कसे देशोधडीला लावत आहे हे दाखवून दिले आहे.


क्लाईड क्रास्टो हे नेहमी आपल्या व्यंगचित्राच्या कुंचल्यातून केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या निर्णयावर बोट ठेवत आले आहेत. केंद्रातील मोदी सरकारला नाही परंतु कांद्याला बळीराजाची कीव आली आहे हे क्लाईड क्रास्टो यांनी मांडत एकप्रकारे केंद्रावर निशाणा साधला आहे.