मास्क न वापरणे व सार्वजनिक ठिकाणी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०८ सप्टेंबर २०२०

मास्क न वापरणे व सार्वजनिक ठिकाणी


थुंकणे, कचरा दानी न ठेवणे, सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्या  
३३४६ लोकांवर कारवाई, ६,७८,५४०/  दंड वसूल


१० पथकांद्वारे कारवाईचंद्रपुर ८ सप्टेंबर  -  शहरात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोनाग्रस्तांची संख्या बघता कोरोना विषयक नियमावलीचे पालन न करणाऱ्या दुकानदार, प्रतिष्ठाने तसेच मास्क न लावणाऱ्या नागरीकांवर कारवाई करण्यात येत सून आतापर्यंत नियम मोडणाऱ्या ३३४६ लोकांवर चंद्रपुर महानगरपालिकेच्या विशेष पथकांनी कारवाई केली असून  नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानदार तसेच नागरीकांकडून ६,७८,५४० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
    शहरात मास्कशिवाय फिरणार्‍या नागरिकांवर कारवाई करण्याबरोबरच सार्वजनीक ठिकाणी थुंकण्याऱ्या, सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्या, कचरा दानी न ठेवणाऱ्या दुकानदारांवर, मास्कचा वापर न करणाऱ्यांवर दंड ठोठावण्यात आला आहे.
   चंद्रपूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. मृतांची संख्या सुद्धा वाढते आहे. नागरीकांना कोरोनापासुन बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतराचे पालन करणे हात स्वच्छ करणे इत्यादी बाबत सुचना मा. महापौर सौ. राखी कंचर्लावार व आयुक्त श्री. राजेश मोहिते यांनी वारंवार केल्या आहेत. तरीही नागरीक सुचनांचे पालन करीत असल्याने मनपाच्या पथकांनी कारवाई करून दंड वसुल केला आहे.  मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यासाठी मनपाद्वारे १० पथकांचे गठन करण्यात आले आहे. पथकात पथक प्रमुख, सहाय्यक कर्मचारी,  स्वच्छता कर्मचारी, अतिक्रमण कर्मचारी व एनसीसी स्टाफ यांचा समावेश असून सर्व पथके शहराच्या विविध भागात कार्यरत राहून कोरोना प्रादुर्भाव टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत.          
    मा. आयुक्त यांच्या निर्देशानुसार,उपायुक्त विशाल वाघ यांच्या नेतृत्वात व सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, शीतल वाकडे, विद्या पाटील यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात अतिक्रमण विभागाचे राहुल पंचबुद्धे, नामदेव राऊत, सौरभ गौतम, रवींद्र कळंबे, सचिन माकोडे, चैतन्य चोरे, नरेंद्र पवार तसेच स्वच्छता निरीक्षक प्रदीप मडावी, उदय मैलारपवार, भूपेश गोठे,विवेक पोतनुरवार, महेंद्र हजारे, अनिरुद्ध राजुरकर, अनिल ढवळे, संतोष गर्गेलवार, जगदीश शेंदरेद्वारे कारवाई  सातत्याने सुरु आहे. या कारवाईसाठी प्रत्येक प्रभागात पथक तैनात केली आहेत.दंड करण्याची कारवाई सातत्याने सुरु राहणार असून आपल्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी मास्क लावुन ठेवण्याचे, सार्वजनीक ठिकाणी न थुंकण्याचे, सोशल डिस्टंसींग पाळण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

आज दिनांक - 8.9.20 ची कारवाई
*मास्क -132/26400
*कचरा दानी न ठेवणे - 19/1900
* थुंकणे - 6/600
* सोशल डीस्टेस - 0/0
====================
          एकुण -161/29300
====================
एकूण दंडात्मक कारवाई.
1) मास्क न वापरणे -
    2548/508540/-
2)सार्वजनिक जागेवर थुंकणे -      
    239/26950/-
3) विना परवानगी दुकान सुरू दंड/
     अवैध खर्रा विक्री
    6/24000/-
4) इतर दंड
     140/31650/-
5) पोलीस विभाग मार्फत
     महानगरपालिकेत जमा.
      412/82400/-
6) सोशल डि. 1/5000
================
TOTAL Rs.
  3346/ 6,78,540/-