जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा जिवती येथे निरीक्षक नसल्याने शेतकरी दोन महिन्यापासून पिक कर्जपासून वंचित - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०८ सप्टेंबर २०२०

जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा जिवती येथे निरीक्षक नसल्याने शेतकरी दोन महिन्यापासून पिक कर्जपासून वंचित

शेतकरी सावकाराच्या दारी

शेतकऱ्यांना तत्काळ पीक कर्ज वाटप करा
श्रमिक एल्गार उपाध्यक्ष घनशाम मेश्राम यांनी मागणी

जिवती/प्रतिनिधी
दिनांक 8/9/2020
जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा जिवती येथे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत असून शेतकरी दोन महिन्या अगोदर सातबारा व आवश्यक कागदपत्रे पिक कर्जासाठी बँकेकडे सादर केले आहेत अशी माहिती शेतकरी कोदू कुमारे यांनी दिली आहे. मात्र बँकेच्या नियोजन शून्य कामामुळे व निरीक्षक अभावी शेतकरी पीक कर्जापासून अनेक महिन्यांपासून वंचित आहेत.

शेतकऱ्यांना शेतीकरण्यासाठी नाईलाजास्तव सावकाराकडे पैशासाठी जावे लागत असल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत. सूत्रांच्या माहिती नुसार जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा जिवती चे शाखा व्यवस्थापक यांचे अपघात झाल्याने मागील दोन महिन्यांपासून त्याच शाखेतील निरीक्षकांना प्रभारी शाखा अधिकारी नेमण्यात आले आहे. यामुळे निरीक्षकांचे काम वेळीच होत नसल्याने शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. प्रभारी शाखा अधिकारी यांची बदली झाल्याने नवनियुक्त शाखा अधिकारी आले आहेत मात्र निरीक्षकाचा प्रश्न जैसे थे आहे.
शेतकरी पिक्कर्जासाठी जिवती येथे रोज चकरा मारत आहेत. यामुळे त्यांना आर्थिक नुकसानही सहन करावा लागत आहे यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ पीककर्ज वाटप करावे अशी मागणी श्रमिक एल्गार उपाध्यक्ष तथा आदिवासी न्याय हक्क परिषदेचे केंद्रीय संयोजक घनशाम मेश्राम यांनी केली आहे.

शासनाचा व कोणत्याही नेत्याचा कुठलाही लक्ष नसल्याने शेतकऱ्यांना मागील दोन महिन्यांपासून पीककर्जापासून वंचित राहावे लागत आहे. असे शेतकरी बोलत आहेत.

तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा जिवती येथील पीक कर्ज तत्काळ देण्यात यावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत.