सिरोंचा शहरात आठवडाभरासाठी राहणार जनता कर्फ्यु - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

३० सप्टेंबर २०२०

सिरोंचा शहरात आठवडाभरासाठी राहणार जनता कर्फ्यु

 सिरोंचा, ता. ३० : सिरोंचा शहर व परिसरात सध्या कोरोना संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे, ही संक्रमण साखळी वेळीच थांबविली नाही तर सिरोंचा शहरात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर होऊन गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, यासाठी उपाययोजना म्हणून सिरोंचा शहरात गुरुवार ते बुधवारपर्यत ७ दिवसांचा जनता कर्फ्यु कडकडीत बंद ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
आज स्थानिक जागृती चौक येथे व्यापारी संघटना व प्रतिष्ठित नागरिक यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत व्यापारी संघटना सिरोंचा व प्रतिष्ठित नागरिकांनी एकमताने निर्णय घेतला आहे.
१ ते ७ आॅक्टोबरपर्यंत सलग ७ दिवस सिरोंचा शहरात कडकडीत बंद राहील, या बंदमध्ये केवळ रुग्णालये, मेडिकल, कृषी केंद्र, दूध आणि वर्तमानपत्र वितरण हेच सुरू राहील, याशिवाय किराणा दुकानांसह इतर सर्व प्रकारची दुकाने, भाजीपाला, हॉटेल, चहा टपरी , पानठेले हे पुढील ७ दिवस सिरोंचा शहरात कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
नागरिकांची  गैरसोय होऊ नये यासाठी सोमवार ते गुरुवार हे दुकान चालू राहणार असल्याने त्यांनी पुढील ७ दिवस पुरेल इतकी खरेदी करून आपली गैरसोय टाळावी, असे आवाहन व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.