नागपूरसाठी विशेष बससेवा उपलब्ध - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३० सप्टेंबर २०२०

नागपूरसाठी विशेष बससेवा उपलब्ध

गडचिरोली, ता. ३० : एमएचटी-सीईटी परिक्षेसाठी प्रशासनाकडून दररोज पहाटे ४ वाजताच्या दरम्यान विशेष गाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतू यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपली नोंदणी किवा माहिती एक दिवस अगोदर देणे आवश्यक आहे.
बसेसमध्ये आवश्यक संख्या पूर्ण होण्यासाठी याबाबतची नोंदणी आवश्यक आहे. परीक्षा केंद्रावर नागपूर येथे ८.४५ च्या अगोदर पोहचणे उमेदवारांसाठी बंधनकारक आहे. त्यामुळे आगाराकडून वेळेत एस.टी. बस  निघण्यासाठी अगोदर संपर्क करून घेणे उमेदवारांसाठी आवश्यक आहे. पहाटे ४ वाजताच्यादरम्यान विशेष बसची व्यवस्था आहे. पंरतू याव्यतिरिक्त दुपारच्या सत्रासाठी जाणाºया व एक दिवस अगोदर जाणाºया उमेदवारांसाठी दिवसभरात नियोजित वेळेनुसार बसेस सुटणार आहेत. यात सकाळी ६.३० वा., ७.३० वा., ८.३० वा., ९.३० वा., १०.३० वा., दुपारी १२.३० वा., १.३९ वा., २.३० वा., आणि ४.३० वाजता एसटी नागपुरकडे जाणार आहेत. तसेच नागपूरहून गडचिरोलीसाठी दैनंदिन स्वरुपात तसेच परिक्षा कालावधीत सायंकाळी ६.00 वा., ७.00 वा. आणि शेवटची बस ८.00 वा. सुटणार आहे. उमेदवारांनी आवश्यक वेळापत्रकाबाबत व अधिकच्या माहितीबाबत आगारातील वाहतूक निरिक्षक अतुल रामटेके 9527572062 आणि वाहतूक नियंत्रक पवन वनकर 9011152062 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.