श्री .प्रफुल्ल काळे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१३ सप्टेंबर २०२०

श्री .प्रफुल्ल काळे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित


श्री .प्रफुल्ल काळे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
नागपूर / अरूण कराळे ( खबरबात )
जिल्हा परिषद हायस्कुल डिफेन्स ,वाडी येथील माध्यमिक शिक्षक श्री प्रफुल्ल विश्वासराव काळे यांची २०१९ -२०२० या वर्षाकरिता माध्यमिक विभागातून आदर्श शिक्षक म्हणून निवड करण्यात आली . त्या निमीत्ताने शुक्रवार दि ११ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद हायस्कुलच्या प्रांगणात शिक्षण सभापती सौ .भारतीताई पाटील यांच्या हस्ते नागपूर पंचायत समीती सभापती सौ . रेखाताई वरठी यांच्या अध्यक्षतेखाली , गटविकास अधिकारी श्री . किरण कोवे ,गटशिक्षणाधिकारी श्री .रामराव मडावी यांच्या प्रमुख उपस्थितीत माध्यमिक शिक्षक प्रफुल्ल काळे यांचा सपत्नीक शाल , श्रीफळ , मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले .
श्री प्रफुल्ल काळे यांच्या उत्कृष्ठ शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची जिल्हा परिषदेकडून आदर्श शिक्षकांची निवड करण्यात आली .
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने शाळा स्तरावर सोहळा आयोजित करण्याचे ठरविले आहे त्यामुळे संबंधित तालुक्यातील अधिकारी व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शिक्षक गौरव पुरस्कार आयोजित करण्यात येत असल्याची माहिती शिक्षण सभापती सौ . भारतीताई पाटील यांनी दिली .
ज्या शिक्षकांना आजपर्यंत शासनस्तरावर आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळाला नाही त्यांनी विद्यार्थ्यासाठी नवनवीन उपक्रम राबवून आपले विद्यार्थी हित जोपासून पुढील शैक्षणिक कार्यात अग्रेसर राहून पुरस्काराच्या शर्यतीत राहावे असे मत गटविकास अधिकारी किरण कोवे यांनी प्रकट केले .शाळेच्या मुख्याध्यापिका सौ . अलका सोनवाने यांनी सत्कारमूर्ती श्री .प्रफुल्ल काळे यांच्या उत्कृष्ठकार्याची माहिती दिली . प्रत्येक विद्यार्थ्याकडे श्री .काळे सर आवर्जुन लक्ष देत असुन विद्यार्थ्यांना शिस्तीत ठेवण्याचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने करीत आहे .असे प्रतिपादन शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष श्री .अनंत भारसाकडे यांनी केले . यावेळी शुभांगी काळे ,लेखाधिकारी श्री .गेडाम, श्री .चव्हाण ,श्री . जीवन येवले , श्री . बंडु लोहारे ,श्री .भोयर,गिरडकर, सौ . रेखा बहुरूपी श्री .सुरेश भोयर , श्री .संदीप गिरडकर ,मेरियन अब्राहम , श्री .शंभरकर प्रामुख्याने उपस्थित होते
संचालन श्री राजेश मरस्कोले , आभार प्रदर्शन श्री विनोद मानकर यांनी केले .