'या' पोलीस ठाण्यातील आरोपी कोरोना पॉझिटिव्ह - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ सप्टेंबर २०२०

'या' पोलीस ठाण्यातील आरोपी कोरोना पॉझिटिव्ह▪️पोलीस ठाणे तात्काळ केले निर्जंतुकीकरण

शिरीष उगे(वरोरा)
वरोरा पोलिसांनी चोरीच्या आरोपात नागरी येथील एका व्यक्तीला शुक्रवारी अटक केली. त्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली असता, शनिवारला ती सकारात्मक आल्याने एकच खळबळ उडाली.
नागरी येथील एका चोरीच्या आरोपात वरोरा पोलिसांनी काही व्यक्तींना शुक्रवारला ताब्यात घेतले आणि त्यांना रात्रभर पोलिस कोठडीत ठेवण्यात आले.
शनिवारला त्या आरोपींना न्यायालयात न्यायचे असल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करून त्याचा अहवाल मागविण्यात आला असता, त्यातील एक आरोपी कोरोना बाधित आला, तर त्याच्यासोबत आलेले इतर सहकारी आरोपी मात्र नकारात्मक आलेत.
त्या आरोपीला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले असून, संपूर्ण पोलिस ठाण्याचे तातडीने निर्जंतुकीकरण करण्यात आले
++++++++++++++++++++++++
पोलिस ठाण्यात अत्यंत आवश्यक काम असेल तरच यावे.....ठाणेदार उमेश पाटील