वाडीत मोबाईलच्या दुकानात चोरी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०४ सप्टेंबर २०२०

वाडीत मोबाईलच्या दुकानात चोरी


वाडीत मोबाईलच्या दुकानात चोरी
रोख रखमेसह मोबाईल लंपास
नागपूर / अरुण कराळे ( खबरबात )
वाडीतील दत्तवाडी येथील सत्यसाई सोसायटी मधील श्री गुरुदेव मोबाईल अँन्ड रिपेरींग सेंटर मध्ये रविवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला . मोबाईलच्या दुकानामध्ये असलेली रोख रक्कम ५६ हजार रुपये व दुरुस्तीला आलेले दोन मोबाईल चोरीला गेला . नवीन मोबाईल काचेच्या बंद कपाटात असल्यामुळे आवाज येईल या भीतीने ते सुरक्षीत होते . मोबाईलचे दुकान तळमजल्यावर असून दुकानाच्या बाजुला व पहील्या माळ्यावर घरची सर्व मंडळी झोपली होती . सकाळी उठताक्षणी दुकानाचे शटर उघडेस्थितीत व दुकानाचे सामान अस्ताव्यस्त स्थितीत पाहताच दुकान मालक समीर मसने यांनी घटनेची माहीती वाडी पोलीस ठाणेला दिली . घटनास्थळी वाडी पोलीस ठाणेचे उपनिरीक्षक लाकडे यांनी पंचनामा करून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला . घटनेला सहा दिवस उलटूनही अजुनही आरोपीचा शोध लागला नाही . वाडीत त्याच दिवशी दोन घरात चोरी झाल्याची माहिती आहे . वाडीत रात्रीला घरातील व दुपारी घरासमोरील दुचाकी , चारचाकी चोरी गेल्याच्या घटना घडत असतांना दुकान व घरे फोडल्याच्या घटनेने स्थानीक नागरीक चिंतेत आहे .