दैनिक रयतेचा वाली प्रथम वर्धापनदिन निमीत्य महाराष्ट्रात उदंड प्रतिसाद - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१८ सप्टेंबर २०२०

दैनिक रयतेचा वाली प्रथम वर्धापनदिन निमीत्य महाराष्ट्रात उदंड प्रतिसाददैनिक रयतेचा वाली प्रथम वर्धापनदिन निमीत्य महाराष्ट्रात उदंड प्रतिसाद
नागपूर , दि . १८ सप्टेंबर ( खबरबात )
महाराष्ट्रातील जाहिरातमुक्त आणि पूर्णत: निशुल्क असलेले एकमेव डिजिटल शैक्षणिक दैनिक रयतेचा वाली या आगळयावेगळ्या मांडणीच्या वृत्तपत्राने वर्षभरात एकूण ३१० अंक प्रसिद्ध करून शिक्षण क्षेत्रातील आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.दैनिक रयतेचा वाली संचा प्रथम वर्धापनदिन मंगळवार १५ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक क्षेत्रातील अनेक नामवंत अधिकारी तसेच मान्यवरांनी शुभेच्छा संदेश पाठविले . राज्यातील जिल्हा व तालुका प्रतिनिधी आणि हितचिंतक मित्रमंडळींनी बॅनर बनवून समाजमाध्यमातून प्रसिद्ध केले. राज्यातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले गेले. सर्व प्रतिनिधी आणि मान्यवरांची झुम मीटिंग घेण्यात आली. त्याच बरोबर पाक्षिक रयतेचा वाली अंक ४ चे प्रकाशनही राज्यातील पहिले बालरक्षक आदरणीय जगदीश कुडे गुरुजी यांच्या शुभहस्ते लोकशाही दिनी करण्यात आले. या मिटिंगच्या माध्यमातून रयतेचा वालीची पुढील दिशा कशी राहील, याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले. रयतेचा वाली निरंतर सुरू राहावा, अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. बालरक्षक चळवळीतील महिला भगिनींनी रयतेचा वालीचे संपादक श्री. शाहू संभाजी भारती सर यांना गृप कॉल करून शुभेच्छा देत आनंदाचा सुखद धक्का दिला.
राज्यातील सर्व परिचित, अपरिचित यांनी प्रतिक्रिया आणि शुभेच्छा संदेश पाठवून रयतेचा वाली परिवाराचे कौतुक केले.