पंतप्रधान मोदींच्या आयुष्यावरील चित्र प्रदर्शनाचे शेलार यांच्या हस्ते उद्घाटन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१७ सप्टेंबर २०२०

पंतप्रधान मोदींच्या आयुष्यावरील चित्र प्रदर्शनाचे शेलार यांच्या हस्ते उद्घाटन

पंतप्रधान मोदींच्या आयुष्यावरील चित्र प्रदर्शनाचे शेलार यांच्या हस्ते उद्घाटन


लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने भाजपा प्रदेश कार्यालयात पंतप्रधान मोदींच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते बुधवारी या चित्रप्रदर्शनाचे उद्घघाटन झाले. यावेळी राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही. सतीश, ज्येष्ठ नेते विनोद तावडे, माजी आमदार मधू चव्हाण, माजी आमदार अतुल शहा, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आणि कार्यालय मंत्री मुकुंद कुलकर्णी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपातर्फे सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान, प्लाझमा दान, स्वच्छता कार्यक्रम, पर्यावरणासंबंधी जागृती असे निरनिराळे उपक्रम या निमित्ताने राबवण्यात येत असल्याचं शेलार यांनी यावेळी सांगितले.

   पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांचा आजवरचा जीवनपट तसेच त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा घटनांची सचित्र माहिती या चित्र प्रदर्शनाद्वारे मांडण्यात आली आहे. हे प्रदर्शन उद्या गुरुवार दिनांक 17 सप्टें. ला दिवसभर भाजपाच्या नरिमन पॉईंट येथील प्रदेश कार्यालयात पाहण्यासाठी खुले राहणार आहे.