दिवंगत पत्रकारांच्या कुटूंबांना ५० लाख रुपये मंजूर करा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१२ सप्टेंबर २०२०

दिवंगत पत्रकारांच्या कुटूंबांना ५० लाख रुपये मंजूर करादिवंगत पत्रकारांच्या कुटूंबांना ५० लाख रुपये मंजूर करा

नागपूर तालुका पत्रकार संघाचे मुख्यमंत्री यांना ई - मेल द्वारे निवेदन

नागपूर / अरूण कराळे ( खबरबात )
कोरोना योद्धा पत्रकार सुनील शेट्टी ,पत्रकार संतोष पवार , पत्रकार माणिकराव वैद्य , पत्रकार नितीन पाचघरे, पत्रकार सागर जाधव, पत्रकार प्रशांत कांबळी या सर्व पत्रकारांचा वार्ताकंन करतांना कोरोना आजाराने निधन झाले . या सर्व पत्रकारांच्या कुटूंबांना सानुग्रह अनुदान मंजुर करून राज्यशासनातर्फे ५० लक्ष रुपये मदत तात्काळ द्यावी .पत्रकारांना विमा सरंक्षण देण्यात यावे , तालुक्यातील कोव्हीड केंद्रात पत्रकारासाठी राखीव बेड उपलब्ध करुन देण्यात यावे , डॉक्टर , नर्स , पोलीस यांच्या सोबतच पत्रकार ही आपला जीव धोक्यात घालून कोरोना विषयीची जनजागृती करीत आहे . अशा दिवंगत पत्रकाराना मदत मिळावी अशा आशयाचा मेल मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना करण्यात आला .

यावेळी नागपूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अरुण कराळे, सल्लागार सुरेश फलके ,उपाध्यक्ष गजेंद्र डोंगरे,सचिव समाधान चौरपगार,
कार्याध्यक्ष दिलीप ठाकरे ,कोषाध्यक्ष सौरभ पाटील ,जिल्हा प्रतिनिधी संजय खांडेकर
प्रसिध्दी प्रमुख जितेंद्र ऊके,नटवर अबोटी
सदस्य सर्वश्री राहुल शेंडे, अजय तायवाडे, शुभम ठाकरे, गजानन तुमडाम,शुभम राऊत ,जय कांद्रीकर प्रामुख्याने उपस्थित होते .