रोजगार हमीच्या कामासाठी बीङीओला साङेचार तास घेराव - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१९ सप्टेंबर २०२०

रोजगार हमीच्या कामासाठी बीङीओला साङेचार तास घेराव
जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना किसान सभेच्या वतीने सुमारे साडेचार तास घेराव घालण्यात आला.
गावागावांमध्ये रोजगार हमीची कामे चालू करण्याची मागणी साठी हा घेराव घालण्यात आला.याबाबत योग्य तो निर्णय घेण्यास गट विकास अधिकारी असमर्थ आहेत असा आरोपही संघटनेने केला. यासंदर्भात जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे किसान सभा मागणार दाद आहेत. अकार्यक्षम अधिकारी आणि ग्रामसेवकांवर कारवाई करण्याची किसान सभेने मागणी केली.

किसान सभा जुन्नर तालुका समितीने दिनांक १६ सप्टेंबर २०२० रोजी रोजगार हमीची गावागावांत कामे सुरु करावीत.यांसह मनरेगाशी संबंधित अनेक प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चा काढण्यासाठी निवेदन दिले होते.

पोलीस प्रशासनाने कोविड १९ च्या परिस्थितीवर सहकार्य करून चर्चेने प्रश्न सोडविण्याची विनंती केली होती.
संघटनेच्या पदाधिकार्यांनी यास प्रतिसाद देवून दिनांक १८ सप्टेंबर २०२० सकाळी ११.३० वाजता शिष्टमंडळ भेटले असता गटविकास अधिकारी यांनी असहकार्याची भूमिका घेतली.
यावर किसान सभेच्या शिष्टमंडळाने
"मागेल त्याला काम मिळालेच पाहिजे" "काम न देणारे बी. डी. ओ. प्रशासन मुर्दाबाद"* "बी. डी. ओ. प्रशासन होश मे आओ" गावागावांत मनरेगाची अंमलबजावणी झालीच पाहीजे.
यासारख्या घोषणा देऊन गट विकास अधिकारी यांचे कार्यालय दणाणून सोडले. व कार्यालयातच ठिय्या आंदोलन सुरु केले आणि निर्णय घेत नाहीत तोपर्यंत गट विकास अधिकारी यांना कार्यालयातच रोखून धरण्याची भूमिका घेतली.
सदर घेराओची दखल घेऊन जुन्नर पोलीस निरीक्षक युवराज मोहिते, पंचायत समिती सभापती विशाल तांबे, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, पंचायत समिती सदस्य काळू गागरे यांनी यावेळी हस्तक्षेप केला.
संघटनेच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा केली आणि गट विकास अधिकारी यांना प्रश्न सोडविण्याची विनंती केली परंतु तरीही गट विकास अधिकारी निर्णय घेण्यास असमर्थ ठरले.
तब्बल साडेचार तास चर्चा झाली. अनेक मागण्या सोडवुन घेण्यास संघटना यशस्वी झाली असली तरीही काही अनेक दिवसांच्या मागण्यांबाबत गट विकास अधिकारी निर्णय घेऊ शकले नाहीत. सर्व अधिकारी पदाधिकारी यांनी जुन्नर तालुका पंचायत समितीचा अत्यंत बिकट कारभार अनुभवला आणि अक्षरः कंटाळून सर्व निघून गेले. पण बी. डी. ओ. मात्र निर्णय घेण्यास तयार नसल्याने संघटनेच्या पदाधिकारी यांनी संघटनेच्या जिल्हा सचिवांना याबाबत माहिती दिली.
जिल्हा सचिव डॉ. अमोल वाघमारे यांनी याबाबत आपण जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागण्यासाठी संघटनेचे शिष्टमंडळ भेटेल. अकार्यक्षम प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहेत.
गावागावातील मजुरांना काम मिळावे म्हणून मनरेगाची प्रभावी अंमलबजावणी करावी यासाठी आंदोलनात्मक कृती करू असे अश्वासन फोनद्वारे दिले असता संघटनेच्या पदाधिकारी यांनी पुन्हा एकदा पंचायत समिती प्रशासनाचा निषेध केला.
मागण्या मान्य न झाल्यास जुन्नर पंचायत समितीला घेराव घालण्याची घोषणा करून अखेर सायंकाळी ४ वाजता आंदोलन मागे घेतले.
संघटनेच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत.
१) ग्रामपंचायमध्ये काम मागणीचे अर्ज स्विकारले जावेत.
२)ग्रामपंचायतमध्ये काम मागणीचे अर्ज उपलब्ध करावेत.
३) हिवरे तर्फे मिन्हेर, शितेवाडी, कोल्हेवाडी या ग्रामपंचायतच्या दाखल प्रस्तावांना ताबडतोब प्रशासकीय मान्यता द्यावी.
३) अन्यथा प्रस्ताव मंजूर होत नाही तोपर्यंत मजुरांना कायद्याप्रमाणे बेरोजगार भत्ता द्यावा.
४) तळेरान गावातील ७५ मजुरांनी २ महिने झाले तरीही कामे चालू केली नाहीत त्यामुळे मजुरांना बेरोजगार भत्ता मिळावा.
५) खटकाळे खैरे ग्रामपंचायतमध्ये मजुरांचे काम मागणीचे अर्ज स्वीकारावेत.
६) इतर गावांमध्ये सरकारी पगार घेणाऱ्या ग्रामसेवकांनकडून कायद्याची माहिती देऊन रोजगार हमीची कामे चालू करावीत.
७) प्रत्येक गावामध्ये ताबडतोब शेल्पवर कामे मंजूर करावीत.
८) तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतला मनरेगाचा वार्षिक कृती आराखडा तयार करण्याचे प्रशिक्षण द्यावे.
९) प्रत्येक गावनिहाय तज्ञांकडून शिवार भेटी आयोजित करून मनरेगाची कामे काढावीत.
१०) प्रत्येक महिन्याला मनरेगा संबंधित यंत्रणेची संघटनेच्या शिष्टमंडळासोबत बैठक बोलवावी.
११) प्रत्येक महिन्याला गावागावांत रोजगार दिवस साजरा करावा.
१२) कुशल अकुशलच्या रेशोप्रमाणे जनावरांसाठी गोठे ग्रामपंचायत पातळीवर मंजूर करावेत,यांसह अनेक मागण्या घेऊन हे आंदोलन झाले. या आंदोलनात किसान सभेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे, जुन्नर तालुका सचिव लक्ष्मन जोशी, भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाचे तालुका सचिव गणपत घोडे, आंबे पिंपरवाडी ग्रामपंचायतचे सरपंच मुकुंद घोडे, एस एफ आय चे तालुका अध्यक्ष अक्षय घोडे, भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघचे तालुका उपाध्यक्ष संदिप रेंगडेदीपक लाडके, गणेश मराडे, सचिन मोरे, चेतन जोशी, खंडू मराडे, ट्रायबल न्यूज इंडियाच्या पत्रकार सौ. आरती निगळे आदि उपस्थित हो