दोन वेगवेगळ्या अपघातात दोन ठार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०२ सप्टेंबर २०२०

दोन वेगवेगळ्या अपघातात दोन ठार
नागपूर चंद्रपूर मुख्य मार्गावर टाकळी जवळील अपघात


शिरीष उगे(भद्रावती ):
नागपुर चंद्रपुर मुख्य मार्गावरील टाकडी फाट्याजवळ झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन ठार झाल्याची घटना काल रात्री दरम्यान घडली.
यातील राकेश रामदास चिकटे वय ३५ वर्ष राहणार जुना कोंढा व सरस्वती सुनेरीलाल वय ६० वर्ष राहणार धानोरा शिवनी मध्य प्रदेश असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे असून राकेश हा आपली मोटर सायकल एम एच ३४ जे ५२९ या वाहनाने चंद्रपूर कडे येत असताना टाकडी फाट्याजवळ उभा असलेला एम एच ४० एके ००१३ या ट्रकला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसर्‍या घटनेत मध्यप्रदेश मधून येणाऱ्या चारचाकी वाहनांमध्ये बिघाड झाल्याने ते वाहन रस्त्याच्या कडेला उभी असताना सरस्वती ही लघुशंकेसाठी रस्त्याच्या पलिकडे गेली असता तिला समोरून येणारे चार चाकी वाहन एम एच ३४ बीएफ ३५२७ वाहनाने धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या दोन्ही घटना काल रात्री दरम्यान टाकळी फाट्याजवळ घडली याप्रकरणी भद्रावती पोलिसांनी मर्ग दाखल करून आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार सुनील सिंह पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे