चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी संतोष रावत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१६ सप्टेंबर २०२०

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी संतोष रावत


चंद्रपूर:
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती 
सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी संतोष 
रावत यांची आज विरोध निवड 
झाली. मनोहर पाऊणकर यांनी 
राजी अध्यक्षपदाचा राजीनामा 
दिल्यानंतर हे पद रिक्त होते.आज 
झालेल्या अध्यक्षपदाच्या 
निवडणुकीत बँकेचे संचालक 
असलेले संतोष रावत यांची 
एकमताने निवड करण्यात आली. 
यावेळी २३ संचालक 
उपस्थित होते. संतोष रावत यांच्या 
रुपाने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती 
सहकारी बँकेवर काँग्रेसचा झेंडा 
रोवला गेला आहे.याआधी संतोष 
रावत यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती 
सहकारी बँकेचे अध्यक्षपद सुद्ध 
भुषविले आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते 
असलेले संतोष रावत यांनी मुल 
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे 
सभापती पद मुल नगरपालिकेचे 
नगराध्यक्ष पद भुषविले आहे. 
राजकारणाचा दांडगा अनुभव 
असलेले संतोष रावत यांनी 
सामाजिक, शैक्षणीक, धार्मीक 
तसेच राजकीय कार्यात आपला 
ठसा उमटविला आहे. संतोष 
रावत यांची चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती 
सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदी 
सर्वानुमते अविरोध निवड 
झाल्याबद्दल मॉ दुर्गा 
मंदिरसमितीच्या वतीने, 
मित्रपरिवरतर्पेâ, पत्रकार संघातर्पâे 
मनपूर्वक हार्दिक अभिनंदन 
करण्यात आले. पंचायत समितीचे 
माजी सभापती व सदश, 
कृषिउत्पन्ना बाजार समितीचे 
संचालक संजय मारकवार, बाजार 
समिती सभापती तथा तालुका 
कांग्रेसचे अध्यक्ष घनश्याम 
येनूरकर, उपसभापती संदीप 
कारंमवार, संचालक तथा नगर 
परिषदेचे माजी उपाध्यक्ष राकेश 
रत्नावर, संचालक अखिल 
गंगारेड्डीवर, विविध कार्यकारी 
सोसायटीचे अध्यक्ष तथा संचालक 
राजेंद्र कन्नमवार, किशोर घडसे, 
डॉ, पद्माकर लेनगुरे, शांताराम 
कामडे आदिंनी अभिनंदन केले 
आहे.