४.१५ रुपयांत १ जीबी डेटा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१४ सप्टेंबर २०२०

४.१५ रुपयांत १ जीबी डेटा

 टेलिकॉम कंपन्या युजर्संना आकर्षित करण्यासाटी नवीन प्लान आणि ऑफर घेऊन येत आहे. तसेच कंपन्या कमी किंमतीत जास्त बेनिफिट ऑफर करतात. या यादीत आता एअरटेलने आपल्या युजर्संना एक जबरदस्त प्रीपेड प्लान ऑफर केले आह. ज्यात ४.१५ रुपयांत १ जीबी डेटा मिळत आहे. 
४.१५ रुपयांत १ जीबी डेटा तुम्हाला एअरटेलच्या ६९८ रुपयांच्या प्लानमध्ये मिळतो. ८४ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा ऑफर केले जात. प्रत्येक दिवसाला १०० फ्री एसएमएस ऑफर करणाऱ्या या प्लानमध्ये देशात कुठेही कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते.जिओ आणि वोडाफोन प्लान
या प्लानची तुलना अन्य कंपन्यासोबत केली तर रिलायन्स जिओ शिवाय वोडाफो - आयडिया सुद्धा एक असाच प्लान ऑफर करीत आहे. रिलायन्स जिओ हा प्लान ५९९ रुपयांच्या प्लान ऑफर करीत आहे. यात १ जीबी डेटा३.५ रुपयांत मिळतो. जिओच्या या प्लानमध्ये ८४ दिवसांची वैधता आणि रोज २ जीबी डेटा सोबत येतो.