पुरामुळे महावितरणचे अडीच कोटीचे नुकसान - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०२ सप्टेंबर २०२०

पुरामुळे महावितरणचे अडीच कोटीचे नुकसानअनेक ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत

गडचिरोली/ख़बरबात:

 पुरामुळे गडचिरोली  जिल्ह्यात महावितरणच्या यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणचे कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.या पुरामुळे जिल्ह्यात महावितरणचे सुमारे अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

 

 मागील आठ्वड्यात जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीतीमुळे चिचडोह गोसेखुर्द,धारण पूर्ण भरले तसेच      वैनगंगा तसेच प्राणहिता व इतर उपनद्यांना महापूर आल्यामुळे महावितरणच्या यंत्रांचे सुमारे २ कोटी ३१लाखाचे नुकसान झाले आहे. पुरामुळे सुमारे ५६० गावे बाधित झाले असून सुमारे ८७ हजार ८०२ ग्राहकांचा वीज पुरवठा बाधित झाला होता.   ब्रम्हपुरी व किन्ही उपकेंद्र पूर्णपणे पाण्यात  बुडाले होते .  या  भागातील ग्राहकांना इतर उपकेंद्रांद्वारे वीज पुरवठा करण्यात येत आहे.  मुसळधार पावसामुळे महावितरणच्या आरमोरीवडसाकुरखेडा येथील प्रत्येकी २ब्रम्हपुरी येथील ३ विज  उपकेंद्रात पाणी शिरल्याने ते बंद ठेवण्यात आले होते.  सोबतच सुमारे २,८०० रोहित्रांना पुराचा फटका बसल्याने वीज ग्राहकांचा वीज पुरवठा बंद ठेवावा लागला. आरमोरी उपविभागातील सुमारे २५ हजार आणि वडसा येथील २० हजार वीज वीज ग्राहकांचा वीज पुरवठा या काळात बंद ठेवण्यात आला होता. तो टप्याटप्याने सुरळीत करण्यात आला.

पुराचे पाणी वाढू लागताच महावितरणकडून खबरदारीचा उपाय म्हणून वीज पुरवठा बंद केल्याने जी हानी टाळणे शक्य झाले. पुरामुळे बाधित ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्याकडून सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहे तसेच या साठी युद्धस्तरावर मोहीम राबविण्यात येत आहे. पाणी कमी होताच या ठिकाणी महावितणकडून  तत्काळ  वीज पुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे.