चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे PCR ला आणलेले दोन आरोपी निघाले कोरोना पॉझिटिव्ह - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०३ सप्टेंबर २०२०

चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे PCR ला आणलेले दोन आरोपी निघाले कोरोना पॉझिटिव्ह

चंद्रपूर/खबरबात:
चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत दोन विविध गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहर पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे.  

चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे दोन गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांचा  पीसीआर मंजूर करण्यात आला होता यादरम्यान त्यांना जेलमधून शहर पोलीस स्टेशन येथे आणले होते.या पीसीआरच्या प्रोसेस दरम्यान संपूर्ण खबरदारी बाळगत या कैद्यांची कोरोना  तपासणी जेलमधून बाहेर येत असताना आणि परत जेलमध्ये जात असताना करावी लगते लागतो.याच दरम्यान त्यांचा कोरोना अहवाल  पॉझिटिव्ह निघाले त्यामुळे आता जेल प्रशासन व कैदी आणि  शहर पोलीस स्टेशन मध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

याआधी देखील चंद्रपूर येथील कारागृहात पावणे दोनशेच्या जवळपास कैदी तर तीन ते चार अधिकाऱ्यांच्या कोरोणा अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर येत आहे .