शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले चांप्याचे सरपंच अतिश पवार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०४ सप्टेंबर २०२०

शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले चांप्याचे सरपंच अतिश पवार

सोयाबीन, कापूस पिकाची केली पाहणी, अती तत्काळ शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी केलीचांपा/ख़बरबात:

येथे नवनिर्वाचित सरपंच सेवा संघ नागपुर जिल्हा सचिव सरपंच अतिश पवार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सोयाबीनला आलेल्या" येलो मोझक" रोगांची व सोबतच दोन आठड्यांपूर्वी पासूनच्या अतिवृष्टीमुळे उमरेड तालुक्यातील चांपा परिसरातील शेतकऱ्यांनी लावलेल्या सोयाबीन पिकावर खोडकीड व येलो मोझक आदी विविध रोगांनी आठवड्यापूर्वी शेतकऱ्यांच्या हातात आलेलं पीक नष्ट झाल्यामुळे सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे समीकरण बिघडले. चांपा परिसरातील संपूर्ण सोयाबीन पीक गेल्याने शेतकरी हा फार मोठ्या संकटात सापडला आहे. 

सरपंच अतिश पवार यांच्या सह तलाठी, कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या. बांधावर जाऊन सोयाबीनवर आलेल्या पिवळ्या रोगाची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला व शेतकऱ्यांना या रोगाची माहिती देत संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी कापूस ,सोयाबीन आदी पिकावर उपाययोजना कशी करावी याचेही मार्गदर्शन कृषी अधिकारी मोर्कड खंडाईत यांनी केले. सोबत कृषी सहायक ज्योती गुंड, तलाठी प्रियंका अलोने. पो. पाटील हंसराज नगराळे , आदी गावातील नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

चांपा परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सोयाबीन  पिकावर खोड कीड , आदी विविध रोगांची पाहणी केली,असता शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, शासनाने अती तत्काळ शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी सरपंच अतिश पवार यांनी शासनानेकडे  केली.