राज्यातील 356 वर्ग दोन ची राजपत्रित मुख्याध्यापकांची पदे "अराजपत्रित" - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१३ सप्टेंबर २०२०

राज्यातील 356 वर्ग दोन ची राजपत्रित मुख्याध्यापकांची पदे "अराजपत्रित"

नागपूर- राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या अधिनस्त असलेली उप शिक्षणाधिकारी वर्ग 2 व जिप माध्यमिक शाळेतील राजपत्रित मुख्याध्यापकांची वर्ग-2 ची पदे रद्दबातल करून सदर पदे जिप शिक्षकांमधून मुख्याध्यापक (अराजत्रित) भरण्याचे शासनाने प्रस्तावित केले असून त्याबाबतची सांख्यकीय माहिती सर्व जिप कडून मागविण्यात आली आहे.
सद्यस्थितीत राज्यात गट शिक्षणाधिकारी, उप शिक्षणाधिकारी व जिप हायस्कूल मधील राजपत्रित मुख्याध्यापकांची शेकडो पदे रिक्त असून शिक्षण विभागाचा सर्व डोलारा प्रभारी वर सुरू असून वर्ग-3 चे केंद्रप्रमुखांची हजारो पदे सुद्धा रिक्त आहेत.
" शासनाने जिप शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांमधून अराजपत्रित हायस्कूल मुख्याध्यापक, गट शिक्षणाधिकारी व उप शिक्षणाधिकारी ही पदे भरून बी एड प्रशिक्षित पदवीधर प्राथमिक शिक्षकांमधून केंद्रप्रमुखांची रिक्त पदे भरावी."
शरद भांडारकर, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेना, नागपूर विभाग.