जिल्हयात नवीन ११९ कोरोना बाधितांची भर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२४ सप्टेंबर २०२०

जिल्हयात नवीन ११९ कोरोना बाधितांची भर

गडचिरोली, ता. २४ :  जिल्हयात गुरुवारी नवीन ११९ कोरोना बाधितांचीही नोंद झाली तर ५४ जण कोरोनामुक्त झाले. यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधित संख्या ६०३ झाली. आत्तापर्यंत एकुण बाधित 2290 रूग्णांपैकी १६७२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आत्तापर्यंत १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
नवीन १२९ बाधितांमध्ये गडचिरोली ३९ यामध्ये  वनश्री कॉलनी ४, पंचायत समिती १, साई नगर १, कारमेल शाळा १, हनुमान वार्ड १७, केमिस्ट १, सी- ६० जवान ३, नवेगाव कॉम्लेरोक्स सुयोगनगर २, कॅम्प एरीया रामपुरी वार्ड २, चामोर्शी रोड २, इंदिरा नगर १, कारगिल चौक शांतीनगर १, बेलगाव १, पारडी १, मेडिकल कॉलनी ३, साई गेस्ट हाऊस धानोरा रोड १, जिल्हा कॉम्लेलोक्स हायस्कुल सोनापूर १, सीआरपीएफ १, आनंद नगर सेमाना रोड २, सोनापूर कॉम्लेलीक्स २, पोलस स्टेशन गड.मागे १, नेहरू वार्ड १, गोकूळनर १व इतर ठिकाणी असे आज गडचिरोलीमध्ये ३९ जण बाधित आढळले. कुरखेडा तलुक्यात ५ यात कढोली ३, राना प्रताप वार्ड १, अहेरी शहर १, आरमोरी १६ यात वडधा ४, वैरागड २, आरमोरी  शहर ९, चामोर्शी ७ यात घोट १, सोनापूर विक्रमपूर चामोर्शी २, हनुमान वार्ड चामोर्शी १, धानोरा ८यात चातगाव १, कटझरी २, धानोरा शहर ४, कारवाफा १. एटापल्ली १५यात सीआरपीएफ ५, हालेवाडा २, एटापल्ली ७, दुर्वा १.  कोरची ३. सिरोंचा ६, वडसा २० यात शिंदी कॉलनी १, आरोग्य कर्मचारी १, जुनी वडसा ३, विसोरा १, गांधी वार्ड १, शिवाजी वार्ड ३, सीआरपीएफ १, आंबेडकर वार्ड १, जवाहर वाँर्ड १, कोविड केअर सेंटर कर्मचारी १,  तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय १ अशा वेगवेगळया तालुक्यात गुरुवारी ११९जण बाधित आढळले.
जिल्ह्यात एकुण सक्रिय कोरोना बाधितांपैकी जिल्हयात वेगवेगळया तालुक्यातील ५४ जण कोरोनामुक्त झाले. यामध्ये अहेरी ३४, आरमोरी १, चामोर्शी ६, धानोरा ३, गडचिरोली १२, कुरखेडा २व वडसा येथील ७ जणांचा समावेश आहे.