वडधामना परिसरात ट्रकचे काच कापुन चालकाला लुटणारी टोळी सक्रिय - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०७ ऑगस्ट २०२०

वडधामना परिसरात ट्रकचे काच कापुन चालकाला लुटणारी टोळी सक्रिय

चालकाची सतर्कता
चोरटे दुचाकी सोडून पळाले

नागपूर / अरूण कराळे (खबरबात)
नागपूर तालुक्यातील वाडी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वडधामना ट्रान्सपोर्ट क्षेत्रात उभे असलेल्या ट्रक चालकास लुटणारी टोळी सक्रिय झाली असून वाहन चालकाच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला आहे.

प्राप्त माहितीनुसार मागील काही दिवसांपासून वडधामना परिसरात रात्री उभ्या असलेल्या ट्रकची काच कापून झोपलेल्या चालकांवर गुंगीचे औषधाची फवारणी करून लूटमार करण्याचा प्रकार सुरू होता.असाच प्रकार शुक्रवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास दोन दुचाकी स्वार उभ्या असलेल्या ट्रकची काच कापून लूटमार करण्याच्या प्रयत्नात असताना पहाटेच्या साखर झोपेत असताना ट्रक चालकास अचानक जाग आली.चालकाने टॉमी काढून चोरट्यांवर हमला केले असता चोरटे घटनास्थळावरून एका मोटारसायकलवर बसून पसार झाले तर मोटारसायकल क्रमांक एमएच ३१ बीवी ३०८८ ला तिथेच सोडली
ट्रक चालकाने सदर घटनेची माहिती इतर चालकांना दिली असता चालकांची गर्दी जमा झाली .आरोपीनी गर्दीतुन मोटारसायकल घेण्यासाठी घटनास्थळी आले असता ट्रक चालकांनी त्यांना पिटाळून लावले व प्रकरणाची माहिती वाडी पोलीस स्टेशनला दिली पोलीस घटनास्थळी पोहचुन पंचनामा केला व बाईक ताब्यात घेऊन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.चोरट्यानी घटनास्थळी सोडलेल्या दुचाकींचा क्रमांक एमएच ३१ बीवी ३०८८ बनावट असल्याची माहिती पुढे येत आहे.