समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२९ ऑगस्ट २०२०

समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन

गडचिरोली, ता. २९ : येथील फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्कअंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने 'बौध्दिक संपदा हक्क आणि पेटंट फाईलिंग' या विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय वेबिनार आयोजि त  करण्यात आले . यावेळी वेबिनारचे अध्यक्ष  प्राचार्य डॉ . एस . के . खंगार होते . तर प्रमुख वक्ते म्हणून लातूर जिल्ह्यातील औसा येथील श्री कुमारस्वामी महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ . एम. एम. बेटकर होते . प्राचार्य डॉ . एस . के . खंगार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की , आजच्या या आधुनिक युगात शिक्षक व विद्यार्थ्यांनी नविन विषयावर संशोधन , पेटंट तयार करण्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे . जे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विकासासाठी फायदेशिर ठरेल . प्रमुख वक्ते डॉ . एम.एम. बेटकर यांनी बौध्दिक संपदा हक्क आणि पेटंट फाईलिंग या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले व सहभागींच्या शंकाचे निराकरण केले . आयोजक व संयोजक, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा . विनोद एम . कुकडे , आयोजक व संयोजक प्रा . डॉ . किशोर बी. कुडे तसेच आयोजन समितीचे इतर सदस्य प्रा . वाय . आर . गहाणे, प्रा . कु . पी. एस. वनमाली , प्रा . डॉ . ए . एस . लाकडे यांनी वेबिनारचे यशस्वीरित्या आयोजन केले . तसेच वेबिनारच्या यशासाठी महाविद्यालयातील शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व ग्रंथालय कर्मचारी यांनी सहकार्य केले .  या वेबिनारमध्ये  219 सहभागी उपस्थित होते . प्रा . विनोद कुकडे यांनी वेबिनारचे संचालन केले. तर  डॉ . किशोर बी . कुडे,  प्रा. यादवराव आर. गहाने यांनी उपस्थितांचे आभार मानले.