आदिवासी महिला जॉब कार्ड साठी धडकल्या ग्रामपंचायतवर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३१ ऑगस्ट २०२०

आदिवासी महिला जॉब कार्ड साठी धडकल्या ग्रामपंचायतवर
स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर बामनवाड्यात दुर्लक्ष

श्रमिक एल्गार संघटना, आदिवासी न्याय हक्क परिषदेचा पुढाकार

राजुरा/प्रतिनिधी/ दिनांक.३१/८/२०२० सोमवार
बामनवाडा येथे मोठ्या संख्येने आदिवासी असून सर्व आदिवासी भूमिहीन होण्याच्या मार्गावर आहेत अनेक भूमाफिया बामनवडा येथील आदिवासींच्या जमिनी आदिवासीच्या नावे खरेदी करून करोडो माया जमविली आहे. मात्र आदिवासींकडे ग्रामपंचायत चा सातत्याने दुर्लक्ष होताना दिसत आहे.

आदिवासी मजूर असताना साधा जाब कार्ड त्यांना देण्यात येत नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल
आदिवासी न्याय हक्क परिषदेचे, व श्रमिक एल्गार संघटनेचे पदाधिकारी बामनवाडा येथे रविवारला मजुरांची बैठक घेऊन प्रश्न समजून घेतले असता त्यांना जॉब कार्ड नाही यामुळे आदिवासी रोजगरापासून अनेक वर्षांपासून वंचित असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. आदिवासी महिला अनेकदा जॉब कार्ड ची मागणी केली. मात्र रोजगार सेवक कानाडोळा करून फक्त मर्जीतल्या लोकांचे जॉब कार्ड करून काम देत असल्याची माहिती बैठकीत आदिवासी महिला कथन केल्या.

यामुळे सर्व आदिवासी महिला ग्रामपंचायत येथे जाऊन जॉब कार्ड बाबत विचारण्याचा निर्धार केला. शेकडो महिला ग्रामपंचायत वर धडकताच सर्वांचे धाबे दणाणले. सर्व महिला रोजगार सेवकाला घेराव केल्याने शेवटी रोजगार सेवक सूरज नगराळे यांनी जॉब कार्ड तत्काळ देण्याचे मान्य केले. यावेळी आदिवासी न्याय हक्क परिषदेचे केंद्रीय संयोजक संतोष कुळमेथे. अभिलाष परचाके यांनी महिलांना योग्य मार्गदर्शन केले.