शिक्षक पुरस्काराला महात्मा ज्योतीराव फुलेंचे नाव द्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

११ ऑगस्ट २०२०

शिक्षक पुरस्काराला महात्मा ज्योतीराव फुलेंचे नाव द्या

शिक्षक पुरस्काराला महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक पुरस्कार असे नाव देण्याची मागणी
                                           


नागपूर/ प्रतिनिधी
५ सप्टेंबर रोजी दिल्या जाणाऱ्या शिक्षक पुरस्काराला महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक पुरस्कार असे नाव देण्याची मागणी डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. 

 राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी शैक्षणिक क्षेत्रात मोलाची कामगिरी करण्याऱ्या शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.    दरवर्षी दिल्या जाणाऱ्या ह्या पुरस्काराला आजपर्यंत कोणतेही नाव देण्यात आलेली नाही. म्हणून* *डॉ.पं.दे.रा.शि.प. च्या वतीने आपणास आग्रही मागणी करण्यात येते कि दरवर्षी देण्यात येणाऱ्या शिक्षक पुरस्काराचे नामकरण महात्मा जोतीराव फुले शिक्षक* *पुरस्कार असे करण्यात यावे. महात्मा ज्योतीराव फुले यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या* *भरिव योगदानाबद्दल त्यांना हीच खरी आदरांजली ठरेल म्हणून महाराष्ट्रातील तमाम शिक्षण प्रेमींची मागणी लक्षात घेवून आपण शिक्षक दिनी दिल्या जाणाऱ्या शिक्षक पुरस्काराला महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक पुरस्कार असे नाव द्यावे अशी आपणास सदरील निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. 

डाँ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष पप्पू पाटील भोयर , प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण नेव्हल, महासचिव सुनिल चव्हाण, कार्याध्यक्ष दयानंद जाधव, कोषाध्यक्ष प्रभाकर पराड, नागपूर विभागीय अध्यक्ष संजय निंबाळकर शांताराम जळते, सतिष काळे, प्रा. शेषराव येलेकर, अंबादास रेडे, हर्षा वाघमारे, कीर्ती काळमेघ, नंदा वाळके,चेतना कांबळे,प्रिया इंगळे,प्रवीण मेश्राम, लोकत्तम बुटले, गजानन कोंगरे, सुरेंद्र बनसिंगे, प्रमोद कडूकर, स्वप्नील ठाकरे, संगीता ठाकरे, सुरज बमनोटे, चेतन चव्हाण, बाबा नागपुरे,समीर शेख, विनोद चिकटे, गौरव शिंदे, राजेश मालापुरे, विजय कांबळे, गुणवंत देव्हाडे, विजय कांबळे, योगेश कडू , संजीव शिंदे, डाँ. विलास पाटील, राजकिरण चव्हाण ,विनोद आगलावे, शामराव लवांडे,, संजय निंबाळकर ,भास्कर कढवणे,अनिल घोरपडे,वल्लभ गाढे,राजेश भोसले, बलवंत घोगरे, देविदास शिंदे,राजेंद्र चव्हाण, निलेश पाटील ,बंडू गाडेकर,राजेश वैद्य, कुंदन पाटील,रत्नाकर मुंगल ,दिलीप गायकवाड, अशोक कुटे,अशोक ढोले,अनिल खेमडे,आनंद पिंगळे , सुनिल चौधरी,अजित वाकसे,सुरेंद्र बालशिंगे,शिवशंकर स्वामी,नितीन पवार,संगिता निंबाळकर,परमेश्वर* *वाघ,सुनिल मनवर,भारत पाटील,रमेश पाटेकर,प्रविण पंडीत,शिवाजी* *मुळे,बाळासाहेब यादव,प्रविण ठोंबरे,विनोद डाखोरे,संजय आम्बरे,राम गायकवाड यांनी मागणी केली आहे.