राजुरा येथे आदिवासी बांधवांकडून कोरोना योद्धा शहीद सुनील टेकाम यांना श्रद्धांजली - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२३ ऑगस्ट २०२०

राजुरा येथे आदिवासी बांधवांकडून कोरोना योद्धा शहीद सुनील टेकाम यांना श्रद्धांजली
राजुरा/प्रतिनिधी
दि.22/8/2020
राजुरा येथील पंचायत समिती चौक येथे कोरोना योद्धा शहीद डा. सुनील टेकाम यांना आदिवासी न्याय हक्क परिषदेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.

डा सुनील टेकाम हे उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे कोरोना आपत्ती येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कर्त्यव्य बजावित असतांना त्यांना कोरोनाची लागण झाली ते चंद्रपूर येथे जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र त्यांच्या प्रकुर्तीत बिघाड आल्याने दि.21/8/2020 ला ते शहीद झाले.

ते मूळचे राजुरा येथील असून त्यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण राजुरा तालुका शोकाकुल असल्याचे मत आदिवासी बांधवांनी व्यक्त केले.

श्रद्धांजली देतेवेळी आदिवासी न्याय हक्क परिषदेचे अध्यक्ष संतोष कुळमेथे , डा. मधुकर कोटणाके, बंडू मडावी, सामजिक कार्यकर्त्या माजी नगरसेविका राधाबाई आत्राम , बाळाराम मसराम , अभिलाष परचाके, मधुकर टेकाम, मनोज आत्राम, नरेंद्र कुळमेथे, शुभम आत्राम, आडे सर, धीरज मेश्राम, नितीन सिडाम इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.