एफआरपी मध्ये 100 रु. ची वाढ करण्याचा निर्णय स्वागतार्ह - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१९ ऑगस्ट २०२०

एफआरपी मध्ये 100 रु. ची वाढ करण्याचा निर्णय स्वागतार्ह


भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर दिवे यांची प्रतिक्रीया


केंद्र सरकारने 2020-21 च्या गळीत हंगामासाठी उसाच्या एफआरपी मध्ये 100 रु.ची वाढ करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. या निर्णयाबद्दल नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे मनःपूर्वक अभिनंदनअशी प्रतिक्रीया भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर दिवे यांनी व्यक्त केली आहे.

प्रसिद्धी पत्रकात श्री. दिवे यांनी म्हटले आहे कीकेंद्र सरकारच्या या निर्णयामुळे ऊस  उत्पादक शेतकऱ्यांना ऊस गाळप हंगामात प्रतिटन 2850 रूपये एफआरपी मिळणार आहे. यापूर्वीचा एफआरपी दर 2750 रूपये होता. उस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंददायी आणि दिलासादायक बातमी आहे.

कोरोना संकटकाळात सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले नाही. आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत शेती क्षेत्रातील पायाभूत सोयी-सुविधा साठी 1 लाख कोटी रूपयांचा निधी दिलामहाराष्ट्रातील रब्बी पिकांच्या खरेदीच्या मर्यादेत आणि मुदतीतही वारंवार वाढ करून शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या एफआरपी वाढीच्या निर्णयाचा ही शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा आहेअसे श्री.दिवे यांनी पत्रकात नमूद केले आहे.