समाजकार्य महाविद्यालयातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२६ ऑगस्ट २०२०

समाजकार्य महाविद्यालयातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत
नागपूर:-समाजकार्य महाविद्यालय कामठीच्या वतीने राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या जनतेला सर्व प्रकारचे सहाय्य करण्याकरिता तसेच या रोगाच्या आपत्ती निवारणासाठी विविध उपाययोजना करण्याकरिता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आर्थिक योगदानातून मदतनिधी जमा करण्यात आला. माननीय मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता जमा केलेली रक्कम ६८२८० रुपये (अडुसष्ट हजार दोनशे ऐंशी रुपये) रकमेचा धनादेश संस्थेचे अध्यक्ष डॉ. पुरणचंद्र मेश्राम यांच्या हस्ते तसेच प्राचार्य डॉ. रमेश सोमकुवर यांच्या उपस्थितीत नागपूर जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी मा.रवींद्र खजांची यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
या प्रसंगी डॉ. प्रणाली पाटील, प्रा. उज्ज्वला सुखदेवे, डॉ. राष्ट्रपाल मेश्राम, रुबीना अन्सारी, प्रा.ओमप्रकाश कश्यप, प्रा.मनोज होले, डॉ.सविता चिवंडे, प्रा. निशांत माटे,प्रा. शशिकांत डांगे, मनीष मुडे, शिक्षकेतर कर्मचारी सुभाष तिघरे, उज्ज्वला मेश्राम, गजानन कारमोरे, किरण गजभिये, वसंता तांबडे, शशील बोरकर,नीरज वालदे उपस्थित होते.