हक्कांसाठी रस्त्यावर उतरून लढू: ७३ व्या वर्धापन दिनी शेकापचा निर्धार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०२ ऑगस्ट २०२०

हक्कांसाठी रस्त्यावर उतरून लढू: ७३ व्या वर्धापन दिनी शेकापचा निर्धारगडचिरोली: देशात आणि राज्यात सत्ताधारी आणि प्रमुख विरोधी पक्ष हे भांडवलदार धार्जिने असल्याने सामान्य माणसाच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे आता रस्त्यावरच्या आंदोलनाची स्वतंत्र भूमिका घेवून सामान्य जनतेचा लढा उभारणे गरजेचे आहे,असे मत शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी व्यक्त केले.

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या जिल्हा कार्यालयात पक्षाचा लाल बावटा फडकविल्यानंतर झालेल्या बैठकीत भाई रामदास जराते यांनी प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
धानाला रुपये ३५००/- हमीभाव मिळाला पाहिजे.अन्यायकारक लॉकडावून मुळे रोजगार हिरावलेल्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना लॉकडावून काळात मासिक रुपये १०,०००/- ची मदत मिळाली पहिजे.अन्यायकारक लॉकडावून काळातील घरगुती व शेतीची वीज बीले माफ झाली पाहिजे. लॉकडावून मुळे मच्छीमार सोसायट्यांच्या झालेल्या नुकसानीपोटी सदर सोसायट्यांना हेक्टरी रुपये १ लाख प्रमाणे मदत मिळाली पाहिजे.गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना शेती आधारित व्यवसायाकरीता रुपये १० लाखांचे कर्ज कोणत्याही अटीशर्ती विना मिळण्यासाठी शासनाने शासन निर्णय घ्यावा या जनसामान्यांच्या प्रश्नांवर जिल्हा स्तरावर व्यापक आंदोलनात्मक जनसंघर्ष उभारण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.
तत्पूर्वी पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी फेसबुक लाईव्ह वरुन राज्यभरातील कार्यकर्त्यांना पक्षाचा वैचारीक वारसा घेऊन जन सामान्यांसाठीचा लढा तिव्र करण्याचे आवाहन केले.
यावेळी पक्षाचे जिल्हा खजिनदार शामसुंदर उराडे, जिल्हा सह चिटणीस भाई रोहिदास कुमरे,डॉ. गुरुदास सेमस्कर,चंद्रकांत भोयर,अक्षय कोसनकर, गजानन अडेंगवार,सोनूजी साखरे,महिला नेत्या जयश्रीताई वेळदा,विजया मेश्राम, मंदाकिनी आवारी,पुष्पा चापले, ज्योत्स्ना चिचघरे,पुष्पा कोतवालीवाले प्रामुख्याने उपस्थित होते.