माझ्या सर्जा रं बिर्जा रं नांगर का पूजिला तू ? - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१८ ऑगस्ट २०२०

माझ्या सर्जा रं बिर्जा रं नांगर का पूजिला तू ?

नागपूर / अरुण कराळे ,(खबरबात)

माझ्या सर्जा रं बिर्जा रं नांगर का पूजिला तू ?
 • आलं कासरं गळ्यांत त्यात गुंतला पहा तू
 • ओढे नांगराचा फाळ वखरात पाय अडे
 • असं कसं रे नशिब ढेकळात धडपडे...

 • नाही दिली बोलीभाषा डोळ्यांतून तू बोलशी
 • मानेवर टाकलेले ओझे निमूट ओढशी
 • चारा दिला तर ठीक नाही दिला तर ठीक
 • बसे र वं थ करत खाल मानेने तू मूक...

 • मोट नाडा गेला तरी ओझे चुकतंच नाही
 • तुझ्या वाचून घराचे पान हालतच नाही
 • जुंपताच बिगी बिगी निघतो तू शेताकडे
 • कधी पोटासाठी पहा नाही घातले साकडे...

 • बारा महिने कुटार पावसाळ्यात गवत
 • मानून तू घेतो गोड मिळेल ते जातो खात
 • एक दिवस पोळ्याला फक्त मिळतो आराम
 • मग बाराही महिने फक्त काम काम काम...

 • तुझ्या कष्टाने पोसल्या शेतकऱ्यांच्या रे पिढ्या
 • तुझ्या पायात असती शेताच्याच साऱ्या नाड्या
 • मूक तुझी ही सेवा रे शेतकऱ्याला भावते
 • म्हणूनच घरदार तुला देवच मानते ....