सावली तालुक्यातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२७ ऑगस्ट २०२०

सावली तालुक्यातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभनिफन्द्रा- चंद्रपूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातर्फे *सावली तालुक्यातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ* विश्वशांती विद्यालय सावली येथे आज दिनांक 27 ऑगस्ट 2020 रोज गुरुवार दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमला अध्यक्ष म्हणून विश्वशांती क. महाविद्यालय सावलीचे प्राचार्य श्री बुरीवार सर, प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सावलीचे गटशिक्षणाधिकारी श्री चव्हाण साहेब, रमाबाई आंबेडकर क. महाविद्यालय सावलीचे प्राचार्य श्री नगारे सर, चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी सचिव श्री पी. टी. ठाकरे सर, चं. जि. मु. संघाचे उपाध्यक्ष श्री जगदीश ठाकरे सर, चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कोषाध्यक्ष श्री अरविंद राऊत सर, ब्रम्हपुरी तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव श्री संजय हटवार सर उपस्थित होते. कार्यक्रमात शालांत प्रमाणपत्र परीक्षा तथा उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत तालुक्यातील प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री समर्थ सर, सुत्र संचालन श्री किरण खोब्रागडे सर तर आभार प्रदर्शन श्री रवींद्र कुडकावर सर यांनी केले. कार्यक्रमाला तालुक्यातील समस्त प्राचार्य/मुख्याध्यापक तसेच विद्यार्थी तथा त्यांचे पालक वर्ग मोठया प्रमाणात उपस्थित होते.