सावलीतील युवकांचा आम आदमी पार्टीत प्रवेश - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०३ ऑगस्ट २०२०

सावलीतील युवकांचा आम आदमी पार्टीत प्रवेश
पाथरी/ प्रतिनिधी
दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी राहिलेला सरकारचा मॉडेलच देशाला आणि युवकांना दिशा देऊ शकते यावर विश्वास ठेवीत सावलीच्या 13 युवकांनी आम आदमी पार्टीत आज प्रवेश घेतला.
आम आदमी पार्टीच्या राज्य नेत्या अॅड. पारोमिता गोस्वामी यांचे नेतृत्वात गिरिजाशंकर दुधे, राजूभाऊ सोनुले, सत्कार घडसे, पवन मेश्राम, सुनील भैसारे, लक्ष्मण शेंडे, गिरीश कोसरे, अमित गुरनुले, रिजवी शेख, हर्षद बांबोडे, दिनेश गेडाम, प्रतिक बोरकर, कृतेश मेश्राम, योगेश गोंगले यांनी आम आदमी पार्टीवर निष्ठा ठेवून पक्ष प्रवेश केला आहे.
सावली शहरातल्या युवकांच्या पक्ष प्रवेशामुळे आम आदमी पार्टीचे विचार तळागाळापर्यंत पोहोचण्यास मदत होईल असा विश्वास अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी याप्रसंगी व्यक्त केला. पक्ष प्रवेशाच्या वेळी आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विजय सिद्धावार, जिल्हा युवा अध्यक्ष गौरव शामकुळे, शशिकांत बतकमवार, पी कुमार पोपटे उपस्थित होते.