दैनिक रयतेचा वाली ३०० वा अंक प्रकाशीत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२० ऑगस्ट २०२०

दैनिक रयतेचा वाली ३०० वा अंक प्रकाशीत

दैनिक रयतेचा वाली ३०० वा अंक प्रकाशीत 
नागपूर / अरूण कराळे (खबरबात 

डिजिटल शैक्षणिक दैनिक रयतेचा वाली ३०० वा अंक गुरूवार २० ऑगस्ट रोजी प्रकाशीत करण्यात झाला. यामागे प्रेरणादायी कार्य करणारे, वाचक, शेअर करणारे, तालुका आणि जिल्हा प्रतिनिधी तसेच सर्व हितचिंतक यांचा सिंहाचा वाटा आहे. शिक्षकांना रयतेचा वाली हे आपल्या हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे .

प्रत्येक शिक्षकांना वाटते की माझे लिखाण वृत्तपत्रात छापले पाहीजे परंतु वृत्तपत्रात ज्याचे धागेदोरे आहे त्यांचेच लेख लागतात .रयतेचा वाली हे एक चांगले व्यासपीठ तयार झाले आहे. या माध्यमातुन शिक्षकांच्या कलागुणांना वाव देणारे व समाजाला प्रेरणा देणारे आहे. 

जीवनात निस्वार्थ पणे दुसऱ्यांसाठी काम करणे ही तशी अवघड गोष्ट आहे. असे असले तरी कोणत्याही मानधनाची अपेक्षा न करता समाजाला विशेषत: शैक्षणिक चळवळीला हे दैनिक व पाक्षिक योग्य दिशेने घेऊन जात आहे.
नियमितपणे शैक्षणीक घडामोडी, अनेक शिक्षकांचे नावीन्यपूर्ण उपक्रम, कविता, शाळेच्या यशोगाथा वाचायला मिळत आहेत. त्यातूनच एखादी नवीन संकल्पना आपल्याही मनात येऊन जाते. दैनिक रयतेचा वालीचे संपादक शाहू संभाजी भारती सर यांचे मानावेत तेवढे आभार कमीच आहेत. अशी प्रतिक्रिया आजच्या अंकात महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांनी दिल्या आहेत .
नाबाद ३०० चा प्रवास जाणून घेण्यासाठी हा अंक अवश्य वाचावा. असे आवाहन डिजिटल शैक्षणिक दैनिक रयतेचा वालीचे मुख्य संपादक श्री. शाहू संभाजी भारती सर यांनी केले आहे .https://online.fliphtml5.com/adlex/sdll/