भाजपा महीला आघाडीचे वाडी पोलीसांना सुरक्षाबंधन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१० ऑगस्ट २०२०

भाजपा महीला आघाडीचे वाडी पोलीसांना सुरक्षाबंधन


भाजपा महीला आघाडीचे वाडी पोलीसांना सुरक्षाबंधन


नागपूर / अरूण कराळे (खबरबात )
भाजपा महीला आघाडीच्या जिल्हा संपर्क मंत्री जनकताई (राजूताई) भोले यांच्या नेतृत्वात वाडी पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी ,कर्मचारी तसेच इतर कामगार वर्ग ,मेडीकल दुकानदार यांच्या हाताला सुरक्षाबंधन बांधून राखीचा सण साजरा करण्यात आला .
बहीण भावाच्या अतूट नात्याची विण घट्ट करणारा सण राखी पौर्णिमा बहिणीकडून भावाच्या हातावर बांधल्या जाणारा धागा हा केवळ रेशिम नसतो तर ते एकप्रकारचे सुरक्षा कवच असते . त्यात असते अव्यक्त वचन . परस्परांच्या संकट काळात धावून येण्याचे . अशाच संकटप्रसंगी नागरीकांच्या सुरक्षेचा बंध पोलिस कायम जपत असतात. असे प्रतिपादन जनकताई भोले यांनी केले . यावेळी भाजपा वाडी मंडळ अध्यक्ष ज्योती भोरकर ,मनोरमा येवले ,सुनीता चावरे आदी उपस्थित होते .