अंतरगाव रुग्ण कल्याण समितीच्या अध्यक्षाने केली स्वतःच्या नावे रक्कमेची उचल - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०५ ऑगस्ट २०२०

अंतरगाव रुग्ण कल्याण समितीच्या अध्यक्षाने केली स्वतःच्या नावे रक्कमेची उचल

चौकशी करून कार्यवाही करण्याची भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष पुनम झाडे यांची मागणी


सावली/प्रतिनिधी
      तालुक्यात सर्वात मोठे असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र अंतरंगाव येथील रुग्ण कल्याण समितीचे विद्यमान अध्यक्ष तथा या क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य यांनी रुग्ण कल्याण समितीच्या खात्यातून स्वतःच्या नावे को. ऑप. बँक अंतरंगाव येथून 32000/-रुपये उचल केल्याचे माहिती अधिकारात मागितलेल्या माहितीतुन उघड झाली आहे. त्यांची तात्काळ चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष पुनम झाडे यांनी तक्रारीतून केली आहे.


स्थानिक जिल्हा परिषद सदस्य हे रुग्ण कल्याण समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. परंतु त्या अध्यक्षाना समितीची कोणतीही रक्कम स्वतःचे नावे उचल करता येत नाही. मात्र येथील काॅग्रेसच्या जि. प. सदस्या वैशाली शेरकी यांनी पदाचा गैरवापर करून पती शाखाधिकारी असलेल्या को. ऑप. बँक अंतरंगाव शाखेतून 32000/- रुपये दि. 21 मार्च 2020 ला उचल केलेली आहे.
जिल्हा परिषद सदस्य तथा रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष यांना समितीचा निधी परस्पर उचल करता येत नाही, तशी तरतूद आहे. असे असताना सदर जिल्हा परिषद सदस्यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचे माहिती अधिकारातून उघङ झाले आहे. 

मिळालेल्या माहितीद्वारे व जिल्हा परिषद सदस्य  व पंचायत समिती सदस्य अधिनियमाअंतर्गत दोषी आहेत. जि. प. अध्यक्ष संध्याताई गुरुनुले, मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष पुनम झाडे यांनी केली आहे.