पोलिस नक्षल चकमकीत एक महिला नक्षली ठार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२७ ऑगस्ट २०२०

पोलिस नक्षल चकमकीत एक महिला नक्षली ठार

गडचिरोली, ता. २६ : एटापल्ली तालुक्यातील जारावंडी पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या दोलंदा जंगल परिसरातील पोलिस व नक्षल्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक महिला नक्षली ठार झाल्याची घटना आज दुपारी घडली.
पोलिस दलाच्या सी-60 पथकाचे जवान आज दोलंदा परिसरातील जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याने नक्षली घनदाट जंगलाचा फायदा घेत पसार झाले. त्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली असता, एका महिला नक्षलीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तीची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.