पाथरी परिसरातील रस्त्यांची दुरावस्था - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२३ ऑगस्ट २०२०

पाथरी परिसरातील रस्त्यांची दुरावस्था

प्रहार संघटना पाथरीची दुरुस्ती करून देण्याची मागणी

पाथरी -- सावली तालुक्यातील पाथरी परिसरातल्या रस्त्याची अतिशय दैनीय अवस्था झाली असून वाहतूक करण्यास तारेवरची कसरत करावी लागत असून गाव तिथे रस्ता ही योजना फोल ठरत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे अपघातास आमंत्रण दिले आहे. पाथरी हे परिसरातील मोठे गाव असून मुख्य ठिकाण आहे. आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी किव्हा आर्थिक व्यवहार करण्यासाठी तसेच आरोग्याच्या सुविधेसाठी, शेतीउपयोगी औषध घेण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी किव्हा इतर बऱ्याच कामासाठी परिसरातील जनता या ठिकाणी रोज ये- जा करते. सावली येथे तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी जनतेला पाथरी वरूनच जावे लागते. गेवरा ते मेहा रस्ता, पालेबारसा ते सायखेडा, उसरपार तुकूम ते मंगरमेंढा जनकापूर, पालेबारसा ते उसरपार चक ते भानापुर मेंढा ते पाथरी रस्त्याची अतिशय दैनीय अवस्था आहे. पाथरी वरून सावली जाण्याकरिता पाथरी ते मुंडाळा तसेच पाथरी सिंदेवाही रस्त्याकडून जाताना मुंडाळा, सावली रस्ता सुद्धा अतिशय खराब झालेला आहे. उसरपार चक ते पालेबारसा रस्त्यावर गोसेखुर्द च्या नहराचे काम केल्यामुळे दोन्ही बाजूने चढाव असून मोठमोठे खड्डे पडलेले आहेत अनेकदा या ठिकाणी अपघात झालेले आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे अधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या परिसरातील रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी प्रहार संघटना शाखा पाथरी तथा जनतेकडून केल्या जात आहे.