बोरमाळा येथील पाच महिलांसाठी पाथरी पोलीस बनले देवदूत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३० ऑगस्ट २०२०

बोरमाळा येथील पाच महिलांसाठी पाथरी पोलीस बनले देवदूत

पाथरी : - बोरमाळा येथील पाच महिला सकाळच्या सुमारास शेतात गेले असता गोसीखुर्दचे पाणी सोडले असल्याने शेतात गेले असलेल्या महीला अडकल्याने पाथरी पोलीसांनी सहकार्य करून देवदुत बनले.

सावली तालुक्यातील बोरमाळा गावी गोसीखुर्द धरणाचे पाणी सोडले गेले असल्याने नदीपात्रातुन पाणी गावात येवुन शीरले या दरम्यान शेतामध्ये निंदा कााढण्यासाठी काही महीला सकाळचा सुमारास गेल्या होत्या. परंतु पाणी झपाटयाने वाढत असल्याने त्या महीला तिथेच अडकल्या. ही माहीत गस्तीवर असलेल्या ठाणेदार योगेश घारे यांना माहीती मिळताच सरपंच व दोन मच्छीमार यांच्या सहऱ्याने रेस्क्यु ऑपरेशन राबवुन एका छोटयाशा नावेने टप्याटप्याने त्या महीलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले व त्यांच्या घरी नेवुन देण्यात आले व पोलीस स्टेशन तर्फे सुचना करण्यात आल्या की नदीपात्राचे पाणी वाढत असल्याने नागरीकांनी पाण्याकाठी जावु नये या रेस्क्यु ऑपरेशन दरम्यान ठाणेदार योगेश घारे, नारायण येगेवार,लता शेन्डे मारेश्वर वट्टी यांनी केली. या दरम्याने सर्वत्र पोलीसांचे कौतुक केले जात आहे.