डॉ. प्रा. कैलास निखाडे यांच्या ऑनलाईन पुस्तकाचे हेमलकसात प्रकाशन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ ऑगस्ट २०२०

डॉ. प्रा. कैलास निखाडे यांच्या ऑनलाईन पुस्तकाचे हेमलकसात प्रकाशन

सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाशभाऊ आमटे यांच्या हस्ते डॉ. प्रा. कैलास निखाडे यांच्या ऑनलाईन पुस्तकाचे प्रकाशन
भामरागड :- डॉ. प्रकाशभाऊ आमटे व डॉ. मंदाताई आमटे यांच्या हस्ते लेखक प्रा. डॉ. कैलास निखाडे यांच्या "चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिकरणाचा होणारा परिणाम " या ऑनलाईन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

याप्रसंगी लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक श्री. अनिकेत आमटे व प्रा. डॉ. संतोष डाखरे उपस्थित होते . तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना सातत्याने स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करणारे प्रा. डॉ .कैलास निखाडे राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालयात भूगोल विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. अतिदुर्गम भाग असल्याने या भागात अनेक समस्या आहेत. या भागामध्ये इंटरनेटसेवा बरोबर उपलब्ध नाही अश्या परिस्थितीत भामरागड तहसिलमध्ये पहिले ऑनलाईन पुस्तक प्रकाशीत केल्यामुळे त्यांचे या परिसरात कौतुक केल्या जात आहे. ते गोडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे भूगोल विषयांसाठी Ph.D. चे मार्गदर्शक आहेत. Save Water ही संकल्पना साध्य करण्यसाठी जलदुत म्हणून कार्यकरीत आहेत. तसेच श्री. मनोहर व श्री. सचिन नुकावर यांनी त्याचे अभिनंदन केले.