अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता १५ शासकीय पॉलिटेक्निक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१७ ऑगस्ट २०२०

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता १५ शासकीय पॉलिटेक्निक


अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना अभियंता बनण्याची संधी
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता १५ शासकीय पॉलिटेक्निकमध्ये
दुसऱ्या पाळीतील वर्गासाठी प्रवेशप्रक्रीया सुरु
राज्यात 1 हजार 920 जागांवर मिळणार प्रवेश
-  मंत्री श्री. नवाब मलिक यांची माहिती

            मुंबईदि. १७ : अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांकरिता राज्यातील १५ शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये (पॉलिटेक्निक) दुसऱ्या पाळीतील वर्ग सुरु करण्यात आले आहेत. या योजनेतून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना अभियंता बनण्याची संधी उपलब्ध झाली असून सध्या तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. पात्र इच्छूक विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज करावाअसे आवाहन अल्पसंख्याक विकास मंत्री श्री. नवाब मलिक यांनी केले आहे. राज्यात दुसऱ्या पाळीतील वर्गांमध्ये 1 हजार 920 इतक्या जागा उपलब्ध असून मेकॅनिकलसिव्हीलइलेक्ट्रिकलकॉम्प्युटरआयटीप्रिटींग टेक्नॉलॉजीइलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आदी अभ्यासक्रमात अल्पसंख्याक विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतातअसे त्यांनी सांगितले.
            सध्या फक्त प्रवेश प्रक्रिया सुरु असून लॉकडाऊनसंदर्भात शासनाच्या आदेशानुसार नंतर वर्ग सुरु करण्यात येतील. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी अर्ज भरण्यासाठी आवश्यक माहितीहेल्पलाईन क्रमांक यासह ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया ही तंत्रशिक्षण संचालनालयाच्या http://www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर सुरु आहे.    
            मंत्री श्री. मलिक म्हणाले कीअल्पसंख्याक मुस्लिमख्रिश्चनबौद्धशीखजैनपारसीज्यु समाजातील विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज करता येईल. ठाणेसोलापूरनांदेडजळगावयवतमाळवांद्रे (जि. मुंबई उपनगर)रत्नागिरीकराड (जि. सातारा)ब्रम्हपुरी (जि. चंद्रपूर)जालनाअंबड (जि. जालना)पुणेहिंगोलीलातुर येथील शासकीय तंत्रनिकेतने आणि मुंबईतील शासकीय मुद्रण तंत्र संस्था (सीएसएमटी समोर) येथे दुसऱ्या पाळीतील वर्ग सुरु होणार आहेत. शासकीय तंत्रनिकेतनमधील काही निवडक व्यवसायांचे अभ्यासक्रम दुसऱ्या पाळीत शिकविले जातात. संचालक (तंत्रशिक्षण) यांनी नियमित तंत्रनिकेतनांमध्ये प्रवेशाकरिता विहित केलेल्या नियमानुसार दुसऱ्या पाळीत प्रवेश देण्यात येतो. एकूण प्रवेश क्षमतेच्या ७० टक्के जागा अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी तर ३० टक्के जागा सर्वसाधारण आणि राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. तंत्रनिकेतनांमधील नियमीत अभ्यासक्रमासाठीही अल्पसंख्याक विद्यार्थी अर्ज करु शकता. तिथे संधी न मिळाल्यास अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या पाळीतील वर्गामध्ये प्रवेश उपलब्ध आहे.
            पॉलिटेक्निक संस्थेचा पत्तासंस्था प्रमुखप्रवेश संख्याप्रशिक्षणाचा कालावधीअभ्यासक्रमाचे नाव इत्यादी माहिती अल्पसंख्याक विकास विभागाच्या http://mdd.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ई-शासन व इतर - अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी दुसरी व तिसरी पाळी मान्यताप्राप्त संस्थांची यादी’ या मेनुवर पाहू शकता.