कोसफुंडी गाव संघटनेने साखरेचा सडवा केला नष्ट - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२८ ऑगस्ट २०२०

कोसफुंडी गाव संघटनेने साखरेचा सडवा केला नष्ट

साखरेचा सडवा नष्ट करताना गाव संघटना
भामरागड, २८ : तालुक्यातील कोसफुंडी गावापासून ४ किमी अंतरावर असलेल्या शेतशिवारात दारूविक्री होत असल्याची माहिती मिळताच गाव संघटनेने धाड टाकून जवळपास तीन मडक्यांत असलेला साखरेचा सडवा नष्ट केला. तसेच दारूविक्रेत्याला पुन्हा दारूविक्री न करण्याची तंबी व समज देण्यात आली.
कोसफुंडी हे गाव दारूमुक्त आहे. मात्र गावापासून दूर वास्त्यव्यास असलेल्या एका इसमाने छुप्या मार्गाने शेतशिवारात दारूभट्टी सुरु केली होती . सदर रस्त्यावरील दारूभट्टीवर ये-जा करणा-यांना दारू पिण्याची सोय होत होती. याबाबतची माहिती गाव संघटनेला मिळताच सदर दारूभट्टीवर धाड टाकून तीन मडक्यांत असलेला साखरेचा सडवा व दारू नष्ट करण्यात आली. यापुढे पुन्हा दारू विक्री न करण्याची समज देखील दारूविक्रेत्यास देण्यात आली. यावेळी मुक्तीपथ तालुका चमू उपस्थित होते.